ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिवसेनेच्या आंदोलनाला यश

नंदोरी पूल बांधकामासाठी १ कोटी ९७ लाख रूपयांची शासनाकड़ून मंजुरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी अतुल कोल्हे

        नंदोरी ग्रामपंचायत अंतर्गत इंदिरानगर परिसरातील नागरिक, शेतकरी, महिला व शाळकरी मुला-मुलींच्या जीवाशी खेळणाऱ्या पुलाच्या गंभीर प्रश्नावर उभारण्यात आलेल्या तीव्र आंदोलनाला अखेर मोठे यश प्राप्त झाले आहे. शासनाच्या वतीने नंदोरी पूल बांधकामासाठी १ कोटी ९७ लाख रुपयांची अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे.

           या पुलाचा प्रश्न सन २०१८ पासून प्रलंबित होता. चांदा ते बांदा योजनेअंतर्गत काम सुरू होऊनही भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडल्याने हा पूल अपूर्ण राहिला होता. पावसाळ्यात नदी पार करताना ग्रामस्थ, शेतकरी व शाळकरी मुलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. मागील वर्षी पुलाच्या अभावामुळे स्वर्गीय श्री. कववडुजी येटे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

नंदोरी ते भद्रावती तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या भव्य पायदळ यात्रा आंदोलनात तहसील कार्यालयात धडक देत सर्वप्रथम स्वर्गीय कववडुजी येटे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली होती. त्यानंतर प्रशासनाला ठाम शब्दांत जाब विचारण्यात आला होता.

या आंदोलनाचा दबाव कामी येत अखेर शासनाने निधी मंजूर करून नंदोरी ग्रामवासीयांच्या मागण्यांना न्याय दिला आहे.

हे आंदोलन शिवसेना लोकसभा संघटक मुकेश भाऊ जीवतोडे, शिवसेना महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य हर्षल भाऊ शिंदे, युवासेना जिल्हा प्रमुख आलेख भाऊ रट्टे यांच्या मार्गदर्शनात, युवासेना लोकसभा सचिव सुरज भाऊ शाहा यांच्या नेतृत्वात तसेच युवासेना जिल्हा संघटक सुमित भाऊ हस्तक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

या लढ्यात युवासेना तालुका संघटक निलेश उरकुळे यांचा मोठा वाटा असून, नंदोरी ग्रामवासी, समस्त शेतकरी वर्ग, महिला, युवक तसेच शाळकरी मुले-मुली मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हा विजय नंदोरी ग्रामवासीयांच्या एकजुटीचा, संघर्षाचा व अन्यायाविरुद्ध उभ्या राहिलेल्या जनआंदोलनाचा आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये