वर्धा जिल्हा पोलीस विभागातर्फे जिल्ह्यात विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन
नागरिकांना 'सुरक्षित प्रवासासाठी हेल्मेट अनिवार्य' असल्याचा संदेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन (रेझिंग डे) सप्ताहाचे औचित्य साधून वर्धा जिल्हा पोलीस विभागातर्फे जिल्ह्यात विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याच उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून, रस्ते सुरक्षा आणि दुचाकी चालवताना हेल्मेटच्या वापराचे महत्त्व पटवून देण्यासाठी रविवार, दिनांक ०४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी वर्धा वाहतूक विभागातर्फे भव्य ‘हेल्मेट रॅली’ काढण्यात आली.
ही रॅली सकाळी ११:०० वाजता पोलीस मुख्यालय येथून सुरू झाली. रॅलीचा मार्ग खालीलप्रमाणे होता:
प्रारंभ: पोलीस मुख्यालय → डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक → बजाज चौक → आर्वी नाका → धुनिवाले मठ → आरती चौक, आरती चौकातून रॅली पुन्हा पोलीस मुख्यालय येथे परतली आणि दुपारी १२:०० वाजता रॅलीचा यशस्वी समारोप झाला. या रॅलीचे नेतृत्व आणि मार्गदर्शन वर्धा जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षकbसौरभ कुमार अग्रवाल यांनी केले.
रॅलीमध्ये पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती, ज्यात खालील मान्यवरांचा समावेश होता: श्री. सदाशिव वाघमारे, अपर पोलीस अधीक्षक.श्री. पुंडलीक भटकर, पोलीस उपअधीक्षक (गृह), वर्धा.श्री. विलास पाटील, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, वर्धा.शेख मजीद शेख बशीर, राखीव पोलीस निरीक्षक.श्री. आशिष चिलांगे, सहायक पोलीस निरीक्षक, सायबर सेल.यासोबतच वाहतूक शाखा, पोलीस मुख्यालय आणि सायबर सेलचे पोलीस अंमलदार मोठ्या संख्येने आपल्या दुचाकींसह आणि हेल्मेटसह या रॅलीत सहभागी झाले होते.
जनजागृतीचा संदेश रॅलीदरम्यान पोलीस विभागातर्फे नागरिकांना ‘सुरक्षित प्रवासासाठी हेल्मेट अनिवार्य’ असल्याचा संदेश देण्यात आला. दुचाकी अपघातात होणाऱ्या जीवितहानीचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि वाहतूक नियमांचे शिस्तबद्ध पालन करण्यासाठी वर्धा पोलिसांनी जनतेला कळकळीचे आवाहन केले आहे.



