ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद चंद्रपूर ग्रामीण, शहर व प्राथमिक विभागाची संयुक्त कार्यकारिणी बैठक संपन्न

चांदा ब्लास्ट

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद चंद्रपूर ग्रामीण, शहर व प्राथमिक विभागाची संयुक्त कार्यकारिणी बैठक दि. 4 जानेवारी 2026 रोजी राणी राजकुवर प्राथमिक शाळा, हॉस्पिटल वॉर्ड, चंद्रपूर येथे दुपारी 1.00 वाजता सभाअध्यक्ष श्री विलास खोंड (जिल्हाध्यक्ष) यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीपणे पार पडली.

या बैठकीस महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद चंद्रपूर शहर, ग्रामीण, प्राथमिक व तालुकास्तरावरील पुढील मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते –

श्री विलास खोंड (जिल्हाध्यक्ष),

श्री विठ्ठल राजूरकर (जिल्हा कार्यवाह),

श्री मधुकरजी मुपीडवार (विभाग उपाध्यक्ष),

श्री रामदासजी गिरडकर (विभाग संघटन मंत्री),

श्री विवेक आंबेकर (कानवेट विभाग प्रमुख),

श्री वसंत वडसकर (शहर कार्यवाह),

श्री विपिन मानकर (शहराध्यक्ष),

श्री अतुल कासनगोटूवार (उपाध्यक्ष),

सौ. सरिता सोनकुसरे (प्राथमिक विभाग अध्यक्ष),

श्री संतोष सोनवणे (प्राथमिक विभाग जिल्हा कार्यवाह),

श्री सुधाकरजी डांगे (तालुका अध्यक्ष, मुल),

श्री संदीप बद्दलवार (तालुका अध्यक्ष, पोंभुर्णा),

श्री रामभाऊ डाहुले तसेच इतर कार्यकारिणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत खालील विषयांवर सविस्तर व सकारात्मक चर्चा करण्यात आली –

1)मागील सभेचा इतिवृत्त वाचन करून सर्वानुमते कायम करणे.

2)सन 2025–26 मधील सदस्य नोंदणी पावती बुक जमा करण्याबाबत चर्चा.

3)जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध तक्रारींबाबत चर्चा करून त्यावर योग्य मार्गदर्शन व पुढील कार्यवाही ठरविणे.

4)जिल्हा व विभाग अधिवेशनाबाबत चर्चा करून निर्णय घेणे.

5)जमा-खर्चास मंजुरी देणे.

माननीय अध्यक्षांच्या अनुमतीने वेळेवर येणारे विषय.

विषय क्रमांक 4 च्या अनुषंगाने सखोल चर्चा करण्यात आली. यावर्षी चंद्रपूर शहर, ग्रामीण व प्राथमिक विभागाचे स्वतंत्र अधिवेशन न घेता, सर्व तालुका, जिल्हा पदाधिकारी, सदस्यांच्या व विभाग पदाधिकाऱ्यांच्या सर्वानुमते यावर्षी विभाग अधिवेशन चंद्रपूर जिल्ह्यात घेण्याचे ठरविण्यात आले.

त्यानुसार विभाग अधिवेशन दि. 28 व 29 मार्च 2026 रोजी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी हॉल, चंद्रपूर येथे आयोजित करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. याबाबत चंद्रपूर शहर, ग्रामीण व प्राथमिक विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्तपणे नियोजन करून विभागाला सहकार्य करून विभाग अधिवेशन यशस्वी करण्याचे ठरविण्यात आले.

सरतेशेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानून माननीय अध्यक्षांच्या परवानगीने आजची सभा दुपारी 4.00 वाजता समाप्त करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये