अवैध रेती भरलेल्या हायवा ट्रकवर तहसीलदाराची धडक कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
पोंभूर्णा :- तालुक्यातील थेरगाव येथील अंधारी नदी पात्रातून अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारा हायवा ट्रक दि.५ जानेवारीला रात्री एक वाजताच्या सुमारास देवाडा खुर्द-पोंभूर्णा मार्गावर तहसीलदार शेलवटकर यांनी कारवाई केली आहे.
पोंभूर्णा तालुक्यातील थेरगाव नदीघाटावरून अवैध रेती भरलेला वाहतूक करणारा ट्रक क्र.(तोMH34BH7179) रविवारला रात्री एक वाजताच्या सुमारास देवाडा खुर्द -पोंभूर्णा मार्गावर तहसीलदार मोहनिश शेलवटकर यांनी हायवा ट्रकची चौकशी केली असता संबंधिताकडे वाळू परवाना नव्हता व अवैद्यरित्या रेती तस्करी करत असल्याचे आढळून आल्याने रेतीने भरलेले ट्रक जप्त करून तहसील कार्यालयाच्या परिसरात लावण्यात आले व पंचनामा करण्यात आला आहे.सदर अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक चंद्रपूर येथील बापू दुर्गम यांचे असल्याची माहिती आहे.
सदर कार्यवाही तहसीलदार मोहनिश शेलवटकर,तलाठी विरेंद्र वाळके यांनी केली आहे.



