ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
पोंभूर्णा येथे जेष्ठ पत्रकारांचा सत्कार कार्यक्रम
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
तालुका पत्रकार संघाच्या वतीने दि. ०६ जानेवारी २०२६ रोज मंगळवारला दुपारी ४ वाजता आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार भवन,पोंभूर्णा येथे पोंभूर्णा तालुक्यातील ग्रामीण भागातील ५० वर्षे व त्यापेक्षा अधिक वय पूर्ण केलेल्या ज्येष्ठ पत्रकारांचा सपत्नीक सत्कार व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आमदार सुधीर मुनगंटीवार, प्रमुख पाहुणे नगराध्यक्ष सुलभा पिपरे,उपनगराव्यक्ष अजित मंगळगिरीवार,तहसीलदार मोहनिश शेलवटकर, कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, गटविकास अधिकारी नमिता बांगर, मुख्याधिकारी निखिल लांडगे यांची उपस्थिती राहणार आहे.



