ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोवरी सेंट्रल परियोजनेसाठी कलम ९ ची अधिसुचना जारी

हंसराज अहीर यांच्या प्रयत्नाने ७ गावातील शेतकऱ्यांना दिलासा

चांदा ब्लास्ट

नोव्हेंबर, डिसेंबर २०२५ मध्ये कोळसामंत्र्यांसोबतच्या बैठकीदरम्यान विशेषत्वाने हा विषय मांडण्यात आला होता.

चंद्रपूर :_ पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या विशेष पुढाकाराने अखेर वेकोलि बल्लारपूर क्षेत्रातील गोयेगांव, गोवरी, मुठरा, खामोना, खैरगांव, अंतरगांव, आर्वी या गावातील अधिग्रहीत शेतजमिनीला गोवरी सेंट्रल परियोजनाकरीता सीबी अॅक्ट सेक्शन 9 ची अधिसुचना दि. 02 जानेवारी 2026 रोजी कोल मंत्रालयाने जारी केली.

   सदर प्रलंबित परियोजनेस पी.आर. मंजुरीपासून तर कॉस्ट प्लस खरेदीदार करारनाम्यापर्यंत आणि सेक्शन 4, सेक्शन 7, सेक्शन 9 करीता प्रस्तावित करण्यापासून तर अधिसुचना जाहीर होईपर्यंत प्रकल्पग्रस्तांनी भाजपा किसान आघाडीचे पूर्व जिल्हाध्यक्ष राजू घरोटे यांच्या नेतृत्वात संबंधित प्रकल्पग्रस्तांनी पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांची प्रत्यक्ष भेट घेवून गोवरी सेंट्रल परियोजनेच्या कार्यान्वयनातील अडसर दूर करण्याची मागणी केली होती.

          या मागणीची गांभीर्याने दखल घेत प्रकल्पग्रस्त बहुसंख्य ओबीसी शेतकरी व इतरांना न्याय मिळण्याकरीता अहीर यांनी सातत्याने नोव्हेंबर-डिसेंबर 2025 मध्ये केंद्रीय कोळसा मंत्री यांच्या भेटी दरम्यान आग्रहपूर्वक विषय उपस्थित केला होता तसेच कोल इंडिया चेअरमन, चंद्रपूर जिल्हाधिकारी, वेकोलि सीएमडी, तसेच बल्लारपूर क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक यांच्या संयुक्त बैठक घेवून गोवरी सेंट्रल परियोजनेच्या कार्यान्वयनातील अडसर दुर करण्याचे तसेच रवीभवन, नागपूर येथे व जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे सुध्दा मार्च 2024 रोजी घेतलेल्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या सुनावणीत या प्रकरणी तातडीने कार्यवाहीचे निर्देश जारी केले होते.

        राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या निर्देशानुसार वेकोलि नागपूर मुख्यालयाने कोल इंडियाद्वारे या परियोजने संदर्भातील प्रकल्प अहवाल, मंजूर करवून घेत कोळसा खरेदीकरीता दि. 06 जून 2024 रोजी एनटीपीसी व वेकोलि दरम्यान कॉस्ट प्लस व खरेदीदार करारनाम्यावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. या करारामुळे आता गोवरी सेंट्रल परियोजनेच्या कार्यान्वयनास मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे या प्रकल्पाची पूढील वाटचाल शिघ्रगतीने होणार आहे.

          गोवरी सेंट्रल प्रकल्पाचा मार्ग मोकळा करण्यासाठी अॅड. प्रशांत घरोटे, मधुकर नरड, पुरूषोत्तम लांडे, लखन अडबाले, पवन एकरे, धनंजय पिंपळशेंडे, ज्ञानेश्वर पिंपळकर, महादेव हिंगाने, अखिलेश लोनगाडगे, भुपेश जुनघरे, योगेश खोके, संजय उईके, पवन उईके, विठ्ठल भोयर, संतोष उईके, केतन खोके व अन्य शेतकऱ्यांनी अहीर यांचेकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. या निर्णयामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. वेकोली प्रबंधनाने आता पूढील प्रक्रीया तातडीने राबवून प्रकल्पग्रस्तांना न्याय द्यावा, अशा सुचना हंसराज अहीर यांनी केल्या.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये