शिक्षकांना ज्ञानदानाचेच कार्य करू द्या : आ. सुधाकर अडबाले
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे चंद्रपूर जिल्हा अधिवेशन

चांदा ब्लास्ट
शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापक, शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मी सदैव कटिबद्ध असून अशैक्षणिक कामांतून शिक्षकांची मुक्तता करून त्यांना ज्ञानदानाचेच कार्य करू द्यावे, असे प्रतिपादन आमदार सुधाकर अडबाले यांनी केले. ते चंद्रपूर येथे ४ जानेवारी २०२५ रोजी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने प्रियदर्शिनी सभागृह येथे आयोजित जिल्हा अधिवेशनात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळ मुंबईचे सरचिटणीस तथा माजी आमदार विश्वनाथ डायगव्हाणे होते. उद्घाटक म्हणून आमदार ॲड. अभिजित वंजारी होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रांतीय अध्यक्ष अरविंद देशमुख, विमाशि संघाचे अमरावती शिक्षक मतदार संघाचे अधिकृत उमेदवार दिलीप कडू, विज्युक्टाचे महासचिव डॉ. अशोक गव्हाणकर, जगदीश जुनघरी, विमाशि संघाचे प्रांतीय उपाध्यक्ष रमेश काकडे, विभागीय कार्यवाह चंद्रशेखर रहांगडाले, कोषाध्यक्ष भूषण तल्हार, लक्ष्मणराव धोबे, डॉ. संजय गोरे, प्रविण नाकाडे, डॉ. प्रवीण जोगी, अरविंद राऊत, विनोद पिसे, प्रा. प्रमोद उरकुडे, अनिल गोतमारे, विजय गोमकर, अविनाश बडे, रवींद्र नैताम, महेंद्र सालंकार, आश्रमशाळा संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिनेश चौधरी, कार्यवाह किशोर नगराळे, पांडुरंग भालशंकर, भाऊ गोरे, सुरेशकुमार बरे, मनोज आत्राम, प्रमोद साळवे, चेतन हिंगणेकर, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुनील शेरकी, जिल्हा कार्यवाह दीपक धोपटे व मोठ्या संख्येने शिक्षकांची उपस्थिती होती.
या अधिवेशनात जुनी पेन्शन योजना लागू करणे, १०-२०-३० योजना माध्यमिक शाळेतील शिक्षकांना लागू करणे, टीईटी संदर्भातील सर्वोच्च न्यायाच्या निर्णयाबद्दल शासनाशी पाठपुरावा करणे, निवड श्रेणी विनाअट लागू करणे, यासह आश्रमशाळा शिक्षकांच्या समस्या, अंशतः अनुदानित शाळांतील शिक्षकांच्या समस्या तसेच विधान परिषदेच्या माध्यमाने शासनाशी केलेला पाठपुरावा याविषयी आमदार सुधाकर अडबाले यांनी मार्गदर्शन केले.
उद्घाटनीय भाषणात आमदार ॲड. अभिजित वंजारी यांनी शिक्षण विभागातील प्रश्न हाताळण्याकडे शासनाचे अक्ष्यम दुर्लक्ष होत असल्याचे मत व्यक्त केले. विमाशी संघाचे अधिकृत उमेदवार दिलीप कडू यांनी टप्पावाढ अनुदान, जुनी पेन्शन योजना यावर मत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात श्री. डायगव्हाणे यांनी विमाशी संघटनेने सुरवातीपासून शिक्षकांच्या हितासाठी आंदोलने केली. तसेच निष्क्रिय शासन धोरणाविरोधात आपला लढा तीव्र करू, असे मत व्यक्त केले.
अधिवेशनात सेवानिवृत्त शिक्षक – कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा उपाध्यक्ष आनंद चलाख, मनीषा बोरगमवार यांनी केले.



