देऊळगाव राजा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी दिवसा रात्र मेहनत घेणार _ नगराध्यक्षा माधुरी शिपणे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी दिवस रात्र मेहनत घेतली जाईल, शहरातील ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही नवनिर्वाचित नगराध्यक्षा माधुरी ताई शिपणे यांनी सत्काराला उत्तर देताना दिली.
देऊळगाव राजा तालुका सेवा निवृत्त कर्मचारी संघटना देऊळगाव राजा, जनसेवा सामाजिक संघटना, सहकार महर्षी भास्कररावजी शिंगणे सार्वजनिक वाचनालय देऊळगाव राजा व जेष्ठ नागरिक संघटना यांच्या वतीने विरंगुळा भवन येथे 4 जानेवारी रोजी नगर परिषद देऊळगाव राजाच्या नवनिर्वाचित अध्यक्षा सौ.माधुरीताई तुषार शिपणे व नगरसेवक व नगरसेविका यांचा सत्कार करण्यात आला, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त कर्मचारी संघटना चे अध्यक्ष बळीराम मापारी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता घनशिराम शिपणे , माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड, ह भ प रामचरनदास निकम गुरुजी,तुषार शिपणे, सुनील शेजुळकर, सौ सुनीता पाटील,गोविंदराव अहिरे, प्रकाश खांडेभराड होते.
नगराध्यक्ष सौ माधुरी शिपणे यांचा सत्कार सौ.आशा ताई शेळके, यांच्या हस्ते करण्यात आला, नवनिर्वाचित नगरसेविका मीना ताई दराडे, प्रदीप वाघ, वनिता भुतडा, रुकसाना नजीर खान, विष्णु झोरे, निशिकांत भावसार, शिवाजी मेहेत्रे, शितल खरात, काशीफखान कोटकर, अलका ताई धन्नावत, नासेर भाई बागवान, दिशाताई खांडेभराड, रंजना झोरे, राजेंद्र खांडेभराड यांचा सत्कार करण्यात आला. श्री.के.पी.खांडेभराड यांनी प्रास्ताविकात चार ही संघटना राष्ट्रीय कार्यात सहभाग घेत असल्याचे सांगून संघटनांच्या वतीने शुभेच्छा दिल्या व आपल्या हातून देऊळगाव राजा नगरीच्या विकासात भर पडेल अशी अपेक्षा व्यक्त केली.
श्री.गोविदराव अहिरे, श्री.रावसाहेब पुजारी प्रा. प्रदीप मिनासे ,यांनी चारही संघटनेची उत्तरोत्तर प्रगती कशी झाली याबाबत माहिती दिली.श्री.धनशिराम शिपणे यांनी देऊळगाव राजा शहराच्या विकासासाठीसंपूर्ण प्रयत्न करण्याची शाश्वती दिली.याप्रसंगी जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष श्री मधुकरराव शेळके, पंडितराव पाथरकर,राम चौधरी, रमेश गवई, मधुकरराव धुळे,शांतिलाल निरफळे, प्रा.विजय रायमल, रामदास कुलथे, मार्तंड घिके, दिनकरराव जाधव, पूर्ण चंद्र जोशी, अरुण सपाटे, रंगनाथ सपाटे,पत्रकार.सुरज गुप्ता तसेच इतर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन प्रकाश अहिरे व रमेश नरोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिव श्री गोविंदराव बोरकर यांनी केले,राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



