गजानन निकम यांचा वाढदिवस श्री संत ज्ञानेश्वर अपंग व मूकबधिर विद्यालय देऊळगाव मही येथे साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा येथील सिविल कॉलनी मध्ये राहणारे गजानन निकम यांचा वाढदिवस देऊळगाव मही येथील संत श्री ज्ञानेश्वर अपंग व मूकबधिर विद्यालय देऊळगावमही येथे साजरा करण्यात आला, आपल्या वडिलांचा वाढदिवस या विद्यालयाच्या विद्यार्थ्यासोबत साजरा करावा असा वेगळा विचार गजानन निकम यांचे पुत्र भैया निकम यांनी मांडला जे आज कर्नाटक मध्ये नोकरी करीत आहे, निकम परिवारातील सर्वांनी या संकल्पनेला पाठिंबा दिला व त्यानंतर या विद्यालयात त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला, विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वितरण निकम परिवार सिविल कॉलनी देऊळगाव राजा यांच्याकडून करण्यात आले.
आज वाढदिवस साजरा करण्यासाठी भरपूर खर्च केला जातो परंतु सामाजिक दृष्टिकोन ठेवून अशा विद्यालयात आपला वाढदिवस साजरा करणे म्हणजे समाजा प्रति असलेली बांधिलकी दिसून येते, याप्रसंगी बोलताना संतचरणरज ह भ प निकम गुरुजी यांनी “जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा “ह्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या व वचनाचे आठवण करून देत या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला तसेच खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या साने गुरुजींच्या वचनाची आठवण करून दिली ह भ प निकम गुरुजी यांनी शिक्षकी देशातून सेवानिवृत्त झाल्यानंतर वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन व प्रवचनाच्या माध्यमातून आपले समाज प्रबोधनाचे कार्य सुरू ठेवले असून युवकांना व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहे ज्याप्रमाणे मूर्तिकार हा दगडातून देव घडवतो त्याप्रमाणे या विद्यालयातील शिक्षक हे या विद्यार्थ्याचे जीवन घडविण्यासाठी अथक प्रयत्न करतात याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले या उपक्रमा बद्दल सर्व थरातून निकम परिवाराचे अभिनंदन होत आहे



