ताज्या घडामोडी

चिमुकल्या अद्विका भोयरची यशस्वी भरारी – गोव्यातील स्पर्धेत रजत व कांस्य पदकावर कोरले नांव

आंतरराज्यीय कराटे स्पर्धेत राजुऱ्याच्या मुलांचा डंका

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

नुकत्याच गोव्यात पार पडलेल्या आंतरराज्यीय कराटे स्पर्धेत राजुरा शहरातील नामांकित उत्साही स्पोर्ट कराटे प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले असून संस्थेच्या 6 विद्यार्थ्यांनी एका सुवर्णपदकाचा एकूण 10 पदकांवर आपले नाव कोरून आंतरराज्य स्तरावर शहराच्या सन्मानात भर घातली.

27 व 28 डिसेंबर दरम्यान गोवा येथे आंतरराज्यीय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ह्या स्पर्धेत देशातील विविध राज्यांच्या स्पर्धकांनी सहभाग घेतला. ह्या स्पर्धेत राजुरा येथिल चिमुकली अद्विका चंद्रकांत भोयर हिने स्पायरिंग प्रकारात रजत तर काता प्रकारात कांस्य पदकाची कमाई करून आपले कौशल्य प्रदर्शित केले. त्याचप्रमाणे पावनी अरुण कोरडे हिने स्पायरिंग प्रकारात सुवर्णपदक व काता प्रकारात रजत पदक प्राप्त केले. हिराई मारोती  कुरवटकर हिने काता मधे रजत पदक, मनस्वी प्रदीप शेंडेने स्पायरिंग प्रकारात रजत तर काता प्रकारात कांस्य पदकावर आपले नाव कोरले, जान्हवी सुनिल मोहुर्लेने स्पायरिंग व काता ह्या दोन्ही प्रकारात कांस्य पदक मिळविले तर मुलांच्या स्पर्धेत शिवम अभय सिंग ने काता प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली.

 

उत्साही स्पोर्ट कराटे प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याने आंतरराज्यीय स्पर्धेत आपल्या कौशल्याने प्रतिस्पर्ध्यांना लोळवून प्राप्त केलेल्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत असुन यशस्वी स्पर्धकांनी आपल्या विजयाचे श्रेय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व कराटे प्रशिक्षक प्रवीण मंगरूळकर व महिला कराटे प्रशिक्षक प्रिया प्रवीण मंगरूळकर ह्यांच्यासह आपल्या आई-वडिलांना दिले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये