ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाहतूक सुरक्षा सप्ताह निमित्ताने महात्मा गांधी विद्यालयच्या विद्यार्थ्यांनी काढली रॅली 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

वाहतूक सुरक्षा सप्ताह निमित्ताने महात्मा गांधी विद्यालय च्या आर एस पी च्या विद्यार्थ्यांनी शहरातून रैली काढण्यात आली.

शाळेतून काढण्यात आलेल्या रॅली ला उपमुख्याध्यापक विजय डाहुले यांनी हिरवी झेंडी दाखविली याप्रसंगी पर्यवेक्षिका सौ माधुरी मस्की, भारती घोंगे, प्रा. नंदा भोयर व इतर शिक्षक उपस्थित होते.वर्ग सातवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांनी रॅली मध्ये सहभाग घेतला, पोलिस ठाण्यात रॅली चे विसर्जन झाले.

पोलिस विभागाकडून विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे महत्व सांगण्यात आले. श्री तोडासे यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थी,शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये