जिवतीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे
जिवती :- भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, कवयित्री व थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९५ वी जयंती पंचशील बुद्ध विहार येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. भारतीय बौद्ध महासभा जिवती व मातोश्री रमाबाई आंबेडकर महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची आठवण करून देण्यात आली. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
उपस्थितांनी सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षण, समानता आणि समाज सुधारण्यासाठी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला. आदर्शांचे स्मरण करत समाजातील शिक्षण व समानतेच्या संदेशाला पुढे नेण्याचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाला जयमाला कांबळे, सुजाता भगत, गिरजा दुर्योधन, अश्विनी रोकडे, विशाखा भगत, निता मोहिते, शीतल नळे, अर्चना कांबळे, संगमा पाटील, वैशाली वाटोरे यांसह अनेकांची उपस्थित होती.



