तुकूम येथे सावित्रीबाई फुले सेवा पुरस्कार वितरण: पाच महिलांचा सन्मान
सावित्रीबाई फुले म्हणजे स्त्री मुक्तीच्या अग्रदूत - डॉ. प्रभा वासाडे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रेरणेने क्रांती ज्योती सावित्रीबाईंनी पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाचा पाया घातला आणि विधवा, दलित, शोषित महिलांसाठी शिक्षणांची सोय करून दिली. त्या ख-या अर्थाने स्त्री मुक्ती च्या अग्रदूत आहेत , असे प्रतिपादन डॉ. प्रभाताई वासाडे यांनी केले.
राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समिती द्वारा आयोजित श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या द्वारकानगरीतील सामुदायिक प्रार्थना मंदिरात झालेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. प्रभाताई वासाडे, माजी मुख्याध्यापिका सौ. सीमा अडबाले, श्रीगुरुदेव सेवा मंडळ तुकूमचे अध्यक्ष अनमुलवार गुरूजी उपस्थित होते.
सौ. अडबाले यांनीही सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेत महिलांचा सहभाग महत्त्वाचा असून अलिकडे महिलांनी कृषी,उद्योग,कला, साहित्य व संस्कृती यांच्या संवर्धनासाठी मोठे योगदान दिले आहे, असे मत बंडोपंत बोढेकर यांनी व्यक्त केले.
यावेळी स्व. वच्छलाबाई मंगरूळकर स्मृती सावित्रीबाई फुले सेवा पुरस्कार योग शिक्षिका छायाताई मायकलवर, सेवा मंडळ संघटिका सौ. उर्मिला पारधी (घुग्घुस), संगीत क्षेत्रातील रश्मी हिवरे यांना तर स्व. पार्वताबाई खानेकर स्मृती सावित्रीबाई फुले सेवा पुरस्कार महिला संघटन कार्यासाठी सौ. अर्पणा चिडे आणि महिला सुरक्षा कार्यासाठी सौ. सीमा चटारे यांना अतिथींच्या हस्ते वितरित करण्यात आले. प्रास्ताविक रोहिणी मंगरूळकर यांनी केले. सूत्रसंचालन ग्रामगीताचार्य प्रा. नामदेव मोरे यांनी तर आभारप्रदर्शन सौ. मंजूषा खानेकर यांनी केले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी डॉ. धर्मा गावंडे, श्री. धारणे, प्रेमलाल पारधी आदी सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.



