महात्मा गांधी विद्यालय येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महात्मा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्याध्यापक श्री विजय डाहुले होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षिका माधुरी मस्की समिती प्रमुख प्रा. नंदा भोयर,गायत्री पिंपळकर, स्वाती केळकर उपस्थित होत्या.
सर्वप्रथम क्रांतिज्योती सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, याप्रसंगी वर्ग आठवीची विद्यार्थिनी प्रतीक्षा पवार व वर्ग सातवी ची विद्यार्थिनी जिज्ञासा पिंपळकर हिने सावित्री बाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला केले त्यासोबतच शितल बोधे , प्रिया दुर्गे प्रा नंदा भोयर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले , यानिमित्ताने विद्यार्थ्यासाठी भाषण स्पर्धा घेण्यात आली, परीक्षक म्हणून वनिता पेंदाम व नरसिंह पांचाळ यांनी केले,कार्यक्रमाचे संचालन समीक्षा बावणे व पूनम मल्लीवार यांनी केले तर आभार प्रदर्शन कल्याणी रत्ने हिने केले.
या कार्यक्रमाला शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



