राष्ट्रीय ग्राहक दिन जिल्हा समाज कल्याण सभागृहात साजरा
श्रीमती वैशाली गजभिये अध्यक्ष श्री विवेक देशमुख दिवानी न्यायाधीश वरिष्ठ स्तर वर्धा यांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 24/12/2025 रोजी जिल्हा समाज कल्याण सभागृह वर्धा येथे राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले श्रीमती वैशाली आर.गजभिये अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच वर्धा श्री विवेक देशमुख सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर वर्धा.श्री.संजय मसंद सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग वर्धा सौ.उषा फाले अध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद वर्धा श्री किशोर मुटे विदर्भ प्रांत कार्यकारिणी सदस्य तथा सदस्य जिल्हा ग्राहक समिती प. वर्धा श्री विनोद पोटे सचिव अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद जिल्हा वर्धा श्री. त्र्यंबक पुष्पलवार अध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका वर्धा श्री अजय भोयर सचिव अखिल भारतीय ग्राहक कल्याण विदर्भ शाखा ॶॅड श्रीमती प्रिती साहू विधी सल्लागार वर्धा श्रीमती बबीता आळंदे सदस्य सचिव जिल्हा ग्राहक समिती पंचायत वर्धा तथा जिल्हा पुरवठा अधिकारी वर्धा मनीषा माजरखेडे पुरवठा निरीक्षक अधिकारी वर्धा यांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आहे.
यानंतर श्रीपती मोरे अप्पर जिल्हाधिकारी वर्धा यांचं स्वागत बबीता आळंदे तहसीलदार जिल्हा पुरवठा निरीक्षक अधिकारी तथा जिल्हा ग्राहक पंचायत समिती वर्धा यांनी केले यानंतर श्रीमती वैशाली गजभिये यांचं स्वागत अजय साबळे ADSO वर्धा यांनी केले विवेक देशमुख दिवानी न्यायाधीश वरिष्ठ स्तर वर्धा यांचं स्वागत बोटीवर यांनी केले संजय मसंद यांचं स्वागत पल्लवी सोलव यांनी केले अनिल तोष्णीवाल यांचं स्वागत बोंबले यांनी केले स्मिता पारखी यांचं स्वागत मोहंते यांनी केले उषा फाले यांचं स्वागत दुर्गा मॅडम यांनी केले किशोर मुटे यांचं स्वागत शुभम यांनी केले.
विनोद पोटे यांचं स्वागत मार्केड यांनी केले ॲड विभा देशमुख यांचं स्वागत सरीता वाघ यांनी केले ॲड प्रिती साहू यांचं स्वागत भगत मॅडम यांनी केले बबीता आळंदे तहसीलदार यांचं स्वागत उषा फाले यांनी केले यानंतर अविनाश नागदेवे जिल्हा प्रतिनिधी वर्धा यांचं स्वागत वैशाली अध्यक्ष गजभिये बबीता आळंदे तहसीलदार विवेक देशमुख दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा सचिव वर्धा किशोर मुटे विनोद पोटे यांनी गुलदस्ता व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहे.
यानंतर राष्ट्रीय ग्राहक दिनांच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले आणि विद्यार्थी आणि विद्यार्थिनी व ग्राहकांना मार्गदर्शन केले यानंतर राष्ट्रीय गीत म्हणुन कार्यक्रम संपला असे जाहीर केले…..



