ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिवनात शिक्षणासोबतच क्रीड़ा आणि सांस्कृतिक उपक्रम महत्वाचे – मुक्तेश्वर कोमलवार

विश्वशांती विद्यालयात स्नेहसंमेलनाचा समारोप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

विश्वशांती विद्यालय, सावली येथे आयोजित वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक स्नेहसंमेलना अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला. या समारोपिय कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव राजाबाळ पाटिल संगिड़वार तर प्रमुख अतिथि म्हणून सावली प.स.चे गटविकास अधिकारी मुक्तेश्वर कोमलवार, पोलिस निरीक्षक प्रदीप पुल्लरवार,केंद्रप्रमुख लोमेश बोरेवार, रवल गड़मवार,डॉ.चंद्रमौलि,कैशिक रेड्डी,विश्वशांती विद्यालयाचे प्राचार्य रविंद्र मुपावार,राजेश झोडे,पांडुरंग अमृतवार आदि मान्यवर उपस्थित होते.

 विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करताना शिक्षणासोबत क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.

आपल्या भाषणात गटविकास अधिकारी मुक्तेश्वर कोमलवार म्हणाले की, “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यासासोबत क्रीडा, कला व संस्कृती या घटकांची तितकीच गरज आहे. अशा स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण, संघभावना व शिस्त विकसित होते. आजचे विद्यार्थी हे उद्याचे सक्षम नागरिक घडविण्याची जबाबदारी शिक्षक व पालकांची आहे.”

स्नेहसंमेलनाच्या कालावधीत विविध क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य, गायन, नाट्य सादरीकरण यांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपली कला व क्रीडाकौशल्य सादर केली. स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना समारोपिय कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले

 मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, पालकवर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्याध्यापकांनी आपल्या प्रास्ताविकात स्नेहसंमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालकांचे आभार मानले.

कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. एकूणच विश्वशांती विद्यालय, सावली येथे आयोजित क्रीडा व सांस्कृतिक स्नेहसंमेलनाचा समारोप उत्साह, आनंद व प्रेरणादायी वातावरणात पार पडला सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वशांति विद्यालयाचे प्राचार्य रविंद्र मुप्पावार संचालन धनंजय गुरनुले तर आभार राजेश झोड़े यानी मानले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये