ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिवशक्ती नगर येथे गजानन महाराज प्रगट दिन साजरा 

हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादचा लाभ 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

शिवशक्तीनगर येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा श्री संत गजानन महाराज यांचा प्रगट दिन भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला, गण गण गणात बोते या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. परिसरातील महिलांनी सकाळी आपापल्या घरासमोर आकर्षक रांगोळ्या काढल्या, सकाळी गजानन महाराजांच्या मूर्ती चे विधिवत पूजन करण्यात आले.

भाविकांनी सामुहिक आरती केली, गजानन विजय ग्रंथाचे वाचन करण्यात आले, ह भ प रामराव महाराज गाडेकर यांचे कीर्तन झाले. आपल्या रसाळ वाणीतून भाविकांना मंत्रमुग्ध केले, त्यानंतर भाविकांनी श्री च्या मूर्तीचे दर्शन घेतले, दुपारी महाप्रसाद कार्यक्रम सुरू करण्यात आला, हजारो भाविकांनी याचा लाभ घेतला. यावेळी माजी आमदार तोताराम कायंदे, डॉ अमोल वाघ, सतीश कायंदे, उप नगराध्यक्ष दीपाली म्हस्के, निलेश ठाकरे, श्याम मेहेत्रे, सिद्धार्थ जाधव, वैभव मिनासे , शिवा ठाकरे, रवी ढवळे, छगन झोरे, भजन मंडळी, उपस्थित होते, प्रगट दिन सोहळा पार पडण्यासाठी महसूल कर्मचारी संघटना चे अध्यक्ष संजय सोनवणे, व इतरांनी मेहनत घेतली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये