ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शासकीय तंत्रनिकेतन ब्रह्मपुरीच्या विद्यार्थिनींनी पटकावले खो-खोचे विजेतेपद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रम्हपुरी :_ आयइडीएसएसए आय झोन नागपूर अंतर्गत मुलांची खो-खो स्पर्धा महाराष्ट्र इंस्टीट्यूट ऑफ पॉलिटेक्निक, बेटाळा येथे नुकत्याच आयोजित करण्यात आल्या. यामध्ये शासकीय तंत्रनिकेतन ब्रम्हपुरीच्या संघाने उत्कृष्ठ खेळ करत विजेतेपद पटकावले.

या संघात आकांक्षा महादेव इंगोले (कर्णधार) यांच्या नेतृत्वात मृणाली देवचंद लोगडे, साक्षी राधेश्याम तोंडरे, जान्हवी दामोदर प्रधान, प्रविणा रवींद्र कोठारे, ऋतुजा गणपत जिवतोडे, दुर्गा आनंदराव भोयर, हर्षा भोजराज कापगते, उज्वला शरद शेंडे, कार्तिका कैलास जुमनाके, दीक्षा माधवराव बनकर आणि पूनम संतोष शेंडे यांनी उत्कृष्ठ खेळ दाखवला व विजेतेपद पटकावले. संघव्यवस्थापक प्रा. हर्षदा आकोटकर, प्रा. मीनाक्षी मानलवार, प्रा. मिनल मून, क्रीडा प्रशिक्षक श्री. मुकेश जाधव आणि क्रीडा प्रभारी प्रा. धनंजय पारधी यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या यशाकरिता डॉ. राजन वानखडे, प्र. प्राचार्य, डॉ. आशिष बहेन्डवार, जिमखाना उपाध्यक्ष यांनी अभिनंदन केले. तसेच श्री. कपिल मेश्राम आणि श्री. विष्णू वैद्य यांचे सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये