नगर परिषद बांधकाम समिती सभापती विष्णू झोरे यांनी स्वीकारला पदभार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर निवडून आलेल्या सदस्या मधून विविध विषय समितीच्या निवडणुका पार पडल्या यामध्ये आमदार मनोज कायदे यांचे खंदे समर्थक व प्रभाग क्रमांक पाच मधून भरघोस मतांनी निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक विष्णू अर्जुन झोरे यांची महायुतीच्या वतीने नगर परिषदेच्या बांधकाम समिती सभापती पदी अविरोध निवड करण्यात आली निवडी नंतर त्यांनी नगरपरिषद कार्यालयात बांधकाम समिती सभापती ची सूत्रे स्वीकारली.
याप्रसंगी त्यांचा यथोचित सन्मान नगरपरिषदचे माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड व सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता धनशीराम शिपणे यांच्या हस्ते करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना त्यांनी सांगितले की श्री बालाजी महाराजांच्या या पुण्यनगरीतील प्रभाग क्रमांक पाच मधील जनतेने माझ्या विनंतीला मान देऊन मला मतदान रुपी आशीर्वाद देऊन जनतेची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली व आमदार मनोज कायंदे यांनी सुद्धा माझ्यावर विश्वास दाखवत बांधकाम समिती सभापतीची माळ माझ्या गळ्यात टाकण्याचा निर्णय घेतला त्यांच्या सुद्धा विश्वासाला मी तडा जाऊ देणार न देता शहरात भविष्यात विविध विकासकामे होतील ती सर्व बांधकामे अंदाज पत्रकानुसारच करून घेण्यात येतील कुठेही तडजोड करण्यात येणार नाही असे त्यांनी सांगितले या प्रसंगी सुभाष दराडे, निशिकांत भावसार, सुनील शेजुळकर, अफरोज बाबा, मोहम्मद रफीक मो. शफी,अभियंता श्रीकांत चिकले, सुनील नागरे, शाम राठोड, नगर रचनाकार हरेश मेघा, बांधकाम लिपिक दिलीप महाजन उपस्थित होते.



