ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री संत गजानन महाराज मंदिर येथे प्रगट दिन मोठया उत्साहात साजरा

हजारो भाविकांनी महाप्रसादचा लाभ घेतला 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 श्री च्या पालखीचे शहरातील विविध भागात भाविकांनी घेतले दर्शन

श्री संत गजानन महाराज मंदिर, कुंभारी, परिसर,देऊळगाव राजा येथे श्री संत गजानन महाराज प्रगट दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. शहराला लागून असलेल्या कुंभारी परिसरात वळण रस्त्याच्या शेजारी श्री गजानन महाराजांचे भव्य दिव्य असे मंदिर आहे श्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त या ठिकाणी मोठ्या उत्साहाचे आयोजन करण्यात येत असते एक फेब्रुवारी पासून या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.

एक फेब्रुवारी रोजी प्रारंभ झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ह भ प भागवताचार्य महंत, श्री स्वामी परमेश्वर यतीजी महाराज यांनी कथा सादर केली, सप्ताह दरम्यान ह भ प नकुल महाराज लंकेआळंदी, उद्भोध महाराज पैठणकर, ह भ प भीमाशंकर गुरुजी परभणी, ह भ प अर्जुन महाराज पळशीकर, ह भ प अनिरुद्ध महाराज क्षिरसागर, ह भ प संतोष महाराज वनवे, ह भ प बंडोपंत महाराज ढाकणे परळी, आधी सह विविध संत श्रेष्ठाचे या ठिकाणी कीर्तन सादर झाले, सात फेब्रुवारी रोजी मंदिर परिसरामध्ये मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याचा लाभ तालुक्यासह जिल्ह्यातून तसेच मराठवाड्यातील भाविकांनी तसेच इच्छुकांनी घेतला, आज श्री संत गजानन महाराज प्रकटदिनी अखंड हरिनाम सप्ताहाचा समारोप ह भ. प निकम गुरूजी यांच्या काल्याच्या किर्तनाने झाला. त्यानंतर महाप्रसाद वितरण करण्यात आला, हजारो भाविकांनी महाप्रसाद चा लाभ घेतला.

पहाटे पाच वाजता श्री पालखी मिरवणूक काढण्यात आली सदर पालखी कुंभारी परिसरातून शहरातील विविध चौकाचौकात प्रभागातून मार्गक्रमण करीत मंदिराकडे प्रस्थान झाले या पालखी मिरवणूक मध्ये ग्रामीण तसेच शहरी भागातून एकूण सव्वाशे दिंड्यांनी सहभाग नोंदविला ,यात दिंडिकरी व भक्त मोठया संख्येने सहभागी झाले होते, टाळ मृदंगाच्या गजरात निघालेल्या दिंडीचे जागोजागी स्वागत करण्यात आले, भाविकांनी दर्शन घेतले. सेवाभावी भक्तांनी दिंडिकरासाठी नाष्टा पानीची सोय केली होती.

मंदीरात पहाटेपासून दर्शनासाठी येणाऱ्या गर्दी होती, शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस निरीक्षक ब्रम्हागिरी यांनी आणि त्यांच्या संपूर्ण पथकाने चोख बंदोबस्त ठेवला होता.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये