ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस भरती 2026 दरम्यान पर्यायी मार्गाचा अवलंब करणे संबंधीत अधिसुचना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्हयात दिनांक 11/02/2026 पासुन दिनांक 23/02/2026 पर्यंत पोलीस भरती 2026 चे आयोजन करण्यात आलेले असुन सदर पोलीस भरती करीता येणाऱ्या उमेदवाराची मैदानी प्रात्यक्षिक चाचणी प्रक्रिया नमुद कालावधीत आयोजीत करण्यात आलेली आहे. पोलीस भरती करिता आलेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी मधिल 800 मिटर व 1600 मिटर धावणे चाचणी ही जिल्हा किडा संकुल येथे पार पाडण्यात येत होती.

परंतु जिल्हा किडा संकुलचे दुरुस्तीचे काम सुरु असल्याने, नमुद मैदानी चाचणी ही सेवाग्राम उड्डाणपुल ते दत्तपूर टि पॉईंट या नविन बनलेल्या रस्त्यावर आयोजीत करण्यात आलेली आहे. त्या करिता मा. पोलीस अधिक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल यांचे कार्यालयीन आदेश कमांक वानिशा/पोलीस भरती/अधिसुचना/2026 वर्धा दि. 09/02/2026 अन्वये महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधिल कलम 33 (1) (ब) नुसार सार्वजनिक रहदारीचे नियमन करण्यात आलेले असुन नमुद रस्ता सेवाग्राम उड्डाणपुल ते दत्तपूर टि पॉईंट या मार्गावरुन चालणारी वाहतुक खालील पर्यायी मार्गान नमुद कालावधीत सकाळी 05:00 वाजता पासुन ते संध्याकाळी 17:00 वाजता पावेतो उपरोक्त आदेशाने वळविण्यात आलेली आहे, वळविण्यात आलेली वाहतुक खालील प्रमाणे मार्गक्रमण करील.

1) सदर बायपास मार्गे होणारी वाहतुक ही दत्तपूर टि पॉईंट कडुन सेवाग्राम कडे-

दत्तपूर टि पॉईंट नालवाडी रोड गोपूरी रोड रेस्ट हाऊस म. गांधी पुतळा सेवाग्राम उड्डाणपुलमार्गे सेवाग्राम.

2) सदर बायपास मार्गे होणारी वाहतुक ही सेवाग्राम उड्डाणपुल कडुन दत्तपूर टि पॉईंट कडे-

सेवाग्राम उड्डाणपुल मगांधी पुतळा रेस्ट हाऊस गोपूरी रोड नालवाडी रोड- दत्तपूर टि पॉईंट या प्रमाणे वळविण्यात येत आहे.

वर्धा जिल्हा पोलीस भरती सन 2025-2026 प्रक्रिये दरम्यान वाहतुक व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये या करीता सर्व नागरीकांनी वर नमुद मार्गाने वाहनाव्दारे प्रवास करणा-या सर्व जनतेने वाहतुक व्यवस्थेचा वापर करावा, शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यास पोलीसांना सहकार्य करावे असे वर्धा जिल्हा पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येत आहे. तसेच भरती प्रक्रीये दरम्यान सार्वजनिक सुटीचे दिवशी सदर मार्गवरील वाहतुक ही नेहमीप्रमाणेच मार्गक्रमण करील.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये