ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुंबई येथे बाबा आमटे राष्ट्रीय पुरस्कार समारोह संपन्न

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विशेष योगदान

चांदा ब्लास्ट

कुठरुग्ण, आदिवासी आणि उपेक्षितांच्या आयुष्यात ‘आनंदवन’ फुलविणारे व भारत जोडो हा नारा देणारे थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून बद्धेय बाबा आमटे एकता अभियान इस्ट द्वारा मुंबई येथील वशवंतराव चव्हाण केंद्रात दि.९ फेब्रुवारी २०२६ ला बाबा आमटे राष्ट्रीय पुरस्कार समारोह संपत्र झाला. या पुरस्कार समारोहा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विशेष सहकार्य लाभले.

या गोष्यात अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संपादिका सरिता कौनिक उद्घाटक स्थानी ज्येष्ठ संपादक व विचारवंत माजी खासदार कुमार केतकर, मानवाधिकार कार्यकर्ते व प्रश्वात अधिवक्ता असीम सरोदे, सत्कारमूर्ती ओ. पी. नहा, माधव बावगे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रविंद्र निंदे आदी उपस्थित होते.

या पुरस्कार समारोहात कलकत्ता येथील कनीट इंडिया सायकल मार्च, १९८९ चे वरिष्ठ समन्वयक व सेंटर फॉर पीस बैंड प्रोग्रेसचे (शांतता व प्रगती केंद्र) संस्थापक ओ. पी. नहा यांना २०२६ चा बाबा आमटे जीवन गौरव राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कार स्वरुपात एक लाख रुपये रोख रक्कम व सन्मान पत्र प्रदान करण्यात आले. तर नातूर वेधीन बनिस (बंधचद्धा निर्मूलन समिती) तथा भारत जोडी सायकल वाजेचे राज्य अध्यक्ष माधव बावरी यांना २०२६ चा बाबा आमटे सामाजिक कार्यकर्ता राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात बाला. या पुरस्कार स्वरुपात पन्नास हजार रुपये रोख व सन्मान पत्र देण्यात आले.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी त्यांचे विचार व्यक्त केले. बाबा आमटे यांच्या जीवनावर प्रकाज टाकला, सत्कारमूर्तीच्या कार्याची ओळख करून देण्यात आली. जिल्हा बँकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे यांचाही सत्कार करण्यात आला, अध्यक्ष स्थानावरून सरिता कौशिक यांनी रविंद्र शिंदे यांच्या कार्याचा गौरव केला.

बाबा आमटे एकता अभियान ट्रस्टचे कोषाध्यक्ष व भारत जोडो सायकल मार्चचे गिरीष पदमावर, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे, उपाध्यक्ष संजय डोंगरे, जिल्हा बँकेचे संचालक तथा माजी आमदार सुवर्णन निमकर, बावेल खान पठाण, जयंत देमुर्वे, रोहित बोम्मावार, दिनेश चोखारे, गणेश तळवेकर, विजय बावणे, निशिकांत बोरकर यांचेसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये