ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादन
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महात्मा गांधी विद्यालय येथे भारताचे दिवंगत पंतप्रधान, उत्कृष्ट संसदपटू, भारतरत्न स्व अटल बिहारी वाजपेयीं यांच्या १०१ व्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.
मुख्याध्यापक श्री साईनाथ मेश्राम, उपप्राचार्य श्री प्रफुल्ल माहुरे, उपमुख्याध्यापक श्री विजयकुमार डाहुले, पर्यवेक्षिका माधुरी मस्की,कनिष्ठ महाविद्यालयातील व माध्यमिक व प्राथमिक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
सर्वप्रथम स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
वामन टेकाम यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.



