ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत होली फॅमिली स्कूलला मुलीला सुवर्ण पदक तर मुलांना रौप्य पदक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय मिनिगोल्फ क्रीडा स्पर्धेमध्ये 17 वर्षाखालील गटा मध्ये होली फॅमिली स्कूलच्या मुलींनी सुवर्ण पदक तर मुलांनी रौप्य पदक वर नाव कोरले आहे मुलींच्या संघात स्वरा दरेकर, लावण्या उरकुंडे, लक्ष्मी आरेंद्रवार, अतिया शेख, आरोही, शोलाणे, यान्हा सुवर्ण पदक तर मुलांच्या संघात शिवम गाडघे, ऐश्वर्या निरंजने,हर्ष बोबडे, प्रथमेश,अर्णव, संबुध, यान्हा रौप्य पदक मिळाले तसेच 14 वर्षाखालील मिश्र गटामध्ये प्रित आणि रिद्धीमा भोंगळे यान्हा सुवर्ण पदक प्राप्त झाले

तर मिनिगोल्फ नॉकआऊट मध्ये 17 वर्षाखालील मुलांना रौप्य पदक पटकवाले आहे या मध्ये कार्तिक, अनिकेत, प्राचार्य सिस्टर दीपा व उप प्राचार्य सिस्टर जिस्मि लोकल मॅनेजर सिस्टर नवीन, क्रीडा शिक्षिका जुही शेख,क्रीडा शिक्षक प्रीतम चौधरी सर या सर्वांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये