गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रसंत साहित्यावर आधारित निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण
७८३ विद्यार्थ्यांचा सहभाग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
श्रीगुरुदेव सेवाश्रम नागपूर अंतर्गत राष्ट्रसंत साहित्य अभ्यास मंडळाच्या वतीने आणि राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्या सहकार्याने गडचिरोली जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयात निःशुल्क जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर निबंध स्पर्धा आगस्ट महिन्यात यशस्वीपणे पार पडली. या निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण अभ्यास मंडळाचे ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांच्या उपस्थितीत जि.प. शिक्षणाधिकारी (माध्य) श्री. वासुदेवराव भुसे, चांदा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार, माजी प्राचार्य पंडित पुडके, पीएम श्री जवाहरलाल नेहरू डिजिटल शाळेचे मुख्याध्यापक सुधिर गोहणे, वसंत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. सुचिता कामडी आदींच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत अ गटात
प्रथम कु. शिवमाला भुरले, वसंत विद्यालय, गडचिरोली,
द्वितीय कु. जयश्री मेश्राम, जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक शाळा तर
प्रोत्साहनपर बक्षीसे
कु. प्रेरणा वाकूडकर, लो. टिळक विद्यालय, गणपूर रै.,
कु. जानवी गवर्णा, शिवाजी हायस्कुल, कु. पूर्वा निकुरे,राणी दुर्गावती कन्या विद्यालय,
कु. श्रीजा चौधरी, पोरेड्डीवार हायस्कुल गोगाव ,
कु. काव्या गेडाम, श्रीगुरुदेव प्राथ. शाळा गडचिरोली,
कु. अनन्या आलूरवार, स्कुल ऑफ स्कॉलर, गडचिरोली यांना देण्यात आले तर
अ गटात
प्रथम कु. ऋषाली अग्गु, जि. प. क. विज्ञान महाविद्यालय गडचिरोली,द्वितीय कु. प्रियंका वाटगुरे, महिला महाविद्यालय, गडचिरोली यांना देण्यात आला तर प्रोत्साहनपर पारितोषिक कु. जानवी सोनवणे कर्मवीर महाविद्यालय अमिर्झा, कु. छकुली इटकेलवार महिला महाविद्यालय यांना देण्यात आले. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. या निबंध स्पर्धेच्या आयोजनात उदय धकाते, प्रा. विलास पारखी, केशवराव दशमुखे , सुरेश मांडवगडे, पंडित पुडके, किरण चौधरी, वरूण धोडरे, पंकज भोगेवार, भाऊराव पत्रे आदींनी परिश्रम घेतले



