पोलीस स्टेशन वर्धा शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाने घर फोडीचा गुन्हा केला उघड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे तक्रारदार राम प्रताप तिवारी राहणार गणेश नगर वर्धा हे काही कामानिमित्त नागपूर येथे दिनांक O9/12/2025 रोजी गेले व 15/12/2025 ला परत आले असता त्यांच्या राहते घराचे कोणीतरी अज्ञात चोरट्याने लॉक तोडून त्यांच्या घरचे घरपो उपयोगी साहित्य कि. 20,000 रुपयाचा माल चोरून नेला. अशा त्यांच्या तक्रारीवरून पोस्टला गुन्हा नोंद असून सदर गुन्ह्याच्या तपासात आम्ही पोलीस हवालदार प्रशांत वंजारी, नरेंद्र कांबळे, पोलीस अंमलदार वैभव जाधव, श्रावण पवार पोलीस स्टेशन वर्धा शहर असे पोस्ट परिसरात पेट्रोलिंग करीत असताना खास मुखबीर कडून माहिती मिळाली की, गिट्टी खदान बोरगाव मेघे वर्धा येथे राहणाऱ्या नंदिनी करण मीटकर वय 21 वर्ष व अर्चना आकाश देवकर वय 24 वर्ष दोन्ही राहणार गिट्टी खदान, बोरगाव मेघे वर्धा यांनी ही चोरी केल्याचे समजले त्यावरून त्याना महिला पोलीस अंमलदार यांच्या मदतीने ताब्यात घेऊन त्याना विश्वासात घेऊन कसून विचारपूस केली असता त्यानी गणेश नगर वर्धा येथील एका घरातून घरात घराचे लॉक तोडून गेल्या 10 ते 12 दिवसापूर्वी चोरी केली असून चोरी केलेला माल त्यांच्या घरी असल्याचे सांगतले त्यांच्याजवळ सदर गुन्ह्यातील 11,300 रुपये चा माल जप्त करण्यात आला सदरची कारवाई हि माननीय पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल सर,अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे सर, उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा विभाग प्रमोद मकेश्वर सर यांच्या निर्देशाप्रमाणे मा.पोलीस निरीक्षक संतोष ताले ठाणेदार पोलीस स्टेशन वर्धा शहर , यांचे मार्गदर्शनात गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पोउनि शरद गायकवाड, गुन्हे प्रगटीकरणपथकाचे पोलीस हवालदार प्रशांत वंजारी, पोलीस हवालदार नरेंद्र कांबळे, पोलीस शिपाई वैभव जाधव, श्रावण पवार, महिला पोलीस अंमलदार जोशना परतेकि, विनिता कावलकर सर्व पोलीस स्टेशन वर्धा शहर यांनी केली. तसेच मा. न्यायालयातून आरोपींचा एक दिवस PCR घेण्यात आला सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार प्रशांत वंजारी पोलीस स्टेशन वर्धा शहर हे करीत आहे तसेच मा. न्यायालयातून आरोपींचा एक दिवस PCR घेण्यात आला



