जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांझुर्णी येथे माजी विद्यार्थी मेळावा संपन्न
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पांझुणीॅ येथे माजी विद्यार्थी मेळावा दिनांक 13 डिसेंबर रोजी घेण्यात आला, याप्रसंगी गावातील बरेच माजी विद्यार्थी आले, सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला, श्री मारोतराव गुडेकर सल्लागार सदस्य यांनी सन १९५८ पासुन भूतकाळातील मागील आठवणी सांगितल्या आणि आता वर्तमान कसा आणि पुढील भविष्यकाळ कसा जाईल या विषयावर खुप काही सांगितले, आपल्या मुलांचे पुढील आयुष्य चांगले शिक्षण घेऊन संस्कार, विकास , व्हावा,शाळा ही गावाचे मुलांचे मंदीर आहे, या मंदीर मध्ये आपण आलो तर काही तरी बनतो आणि समोर प्रगती करतो, आणि देवस्थान मधील देव मंदिरात गेलो तर जसा आहे तसाच राहतो एवढा फरक आहे असे सांगीतले, श्री अशोक राऊत शिक्षण विस्तार अधिकारी बीट माढेळी यांनी वर्तमान स्थितीतील शिक्षणाबद्दल, राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार चालू असलेल्या विविध उपक्रमात माजी विद्यार्थ्यांनी,पालकांनी शाळेला सहकार्य करुन शाळेचा दर्जा उंचावण्याबाबत , सामाजिक विविध शैक्षणिक उपक्रम घेण्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच मुख्याध्यापक श्री अम्रुत गेडाम, यांनी शाळे विषयी विद्यार्थी, व गावा करीता आणि विद्यार्थी यांचे आई,वडील, पालक, करीता बरीच माहीती सांगीतली व काही शाळेच्या विकासा बाबत समस्या सांगितल्या,सरपंच निर्मलाताई सुनिल दडमल यांनी उदघाटन केले, शाळा समिती अध्यक्ष सौ, मथुराताई संजयभाऊ चांभारे, प्रमुख पाहुणे मा, अशोक राऊत बिट विस्तार अधिकारी, बीट माढेळी , शाळा समिती सदस्य प्रितीताई मिलमिले, मुख्याध्यापक अम्रुतजी गेडाम, सौ सुनंदाताई घोरुडे , श्री जुमडे सर,मारोतराव गुडेकर, अनिकेत काळे, सिद्धार्थ लोखंडे, कु,शिवानी बुरडकर कु, नयना बुरडकर, कु, कल्याणी बुरडकर, गणेश कुमार चांभारे, ओंकार चांभारे, कु,प्रियंका,मेश्राम ,वैशाली आत्राम, तसेच पालक वर्ग प्रशांत हनुमंते,चंद्रशेखर चांभारे, मारोतराव घुगरे, चरनदास येलादे,प्रशांत मुंडरे, अंकुश मेश्राम, विलास धाडसे, उमाबाई दडमल कु,परी धर्मराज दडमल विद्यार्थी व पालक, शिक्षक ,गावातील नागरिक उपस्थित होते शेवटी आभार प्रदर्शन सुनंदाताई घोरुडे यांनी केले



