खैरगाव येथे कर्मयोगी तुकारामदादा गीताचार्य जयंती साजरी तथा ग्रामस्वराज्य दिनदर्शिकेचे विमोचन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
श्रीगुरूदेव सेवा मंडळ ऊर्जानगर व खैरगांव (चांदसुर्ला) शाखेच्या वतीने श्रीगुरुदेव सामुदायिक प्रार्थना मंदिर खैरगाव येथे कर्मयोगी संत तुकारामदादा गीताचार्य यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून श्रीगुरुदेव सेवा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. प्रतिभा पत्रकार अध्यक्षस्थानी होत्या .तर ज्येष्ठ नागरिक तथा माजी पोलीस पाटील आनंदराव ताजने यांनी उद्घाटन केले. प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ साहित्यिक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर तर धम्ममित्र नामदेव गेडकर , उर्जानगर शाखेचे सहसचिव सुयोग वऱ्हाटे यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक देवराव कोंडेकर यांनी केले तर धम्ममित्र नामदेव गेडकर यांनी कर्मयोगी दादांची आठवण सांगितली.यावेळी श्रीमती पत्रकार म्हणाल्या की, कर्मयोगी गीताचार्य दादा हे अतिशय ध्येयवादी होते ,ते कामालाच राम मानत होते, अश्या त्या म्हणाल्या.
बंडोपंत बोढेकर यावेळी म्हणाले की, सेवा मंडळाच्या प्रचार यज्ञात दादांनी आपले जीवन समर्पित केले.त्यांचे सेवाभावी त्यागी जीवन , संत तत्वांचे आचरण, लोकजागृती अलौकिक असे होती .
यावेळी कर्मयोगी तुकारामदादा गीताचार्य विचार प्रतिष्ठान नागपूर द्वारा निर्मित ग्रामस्वराज्य दिनदर्शिका २०२६ चे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मंडळाचे वतीने बंडोपंत बोढेकर व सुयोग वऱ्हाटे यांना वाढदिवसानिमित्त भेटवस्तू देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उर्जानगर शाखेचे सेवाधिकारी श्री.शंकर दरेकर यांनी केले तर आभार दिक्षा वाघ यांनी मानले. यावेळी स्वतंत्र युवा संस्था खैरगांव व गुरूदेव सेवा मंडळाच्या सेवकांचा सहयोग लाभला व शेवटी राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



