ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावती येथे १८ ते २० डिसेंबरला श्री साईबाबा स्थापना दिन उत्सवाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

       श्री.साईबाबा मंदिर सेवा समिती व उत्सव समितीच्या वतीने स्थानिक बगडे वाडी येथील श्री साईबाबा मंदिर येथे दि. १८, १९ व २० डिसेंबर रोजी श्री साईबाबा स्थापना दिन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरुवार, दि. १८ डिसेंबर रोजी सकाळी साईबाबा मूर्तीपूजन, घटस्थापना व आरती होणार असून सकाळी स्वच्छता अभियान, दुपारी रांगोळी स्पर्धा व भजन संमेलन, तर सायंकाळी आरती व सागर महाराज नांदुरकर यांचे भारूड आयोजित करण्यात आले आहे.

शुक्रवार, दि. १९ डिसेंबर रोजी सकाळी मूर्तीपूजन व आरतीनंतर स्पंदन हार्ट इन्स्टिट्यूट, नागपूर यांच्या सौजन्याने हृदयरोग तपासणी शिबिर होणार आहे. सायंकाळी ज्ञानेश्वरी हरिपाठ व त्यानंतर श्री साईबाबा प्रतिमेची भव्य पालखी शोभायात्रा काढण्यात येणार आहे. रात्री ओमसाई भजन मंडळ, किल्लावार्ड यांच्या भजनसंध्येचे आयोजन आहे.

शनिवार, दि. २० डिसेंबर रोजी पहाटे साईबाबा मूर्ती अभिषेक, सकाळी भजन संध्या, दुपारी किर्तन व गोपालकाला, त्यानंतर अहवाल वाचन व आभार प्रदर्शन होऊन सायंकाळी महाप्रसादाने उत्सवाची सांगता होणार आहे.

भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये