घुग्घूस नगरपरिषद निवडणूक २०२५ : नवा चेहरा पुढे येण्याची शक्यता
सर्व प्रभागांत चुरशीची लढत

चांदा ब्लास्ट
नगरपरिषद निवडणूक २० डिसेंबर २०२५ रोजी पार पडणार असून मतमोजणी २१ डिसेंबरला होणार आहे. या वेळी व्यापारी, शिक्षक, सेमी-सरकारी कर्मचारी, खाजगी कंपनीतील कर्मचारी, समाजसेवक, पत्रकार अशा प्रत्येक क्षेत्रातून उमेदवार मोठ्या संख्येने रिंगणात उतरले आहेत. नगरात सध्या फक्त एकच चर्चा रंगली आहे— “यंदा कोणता नवा चेहरा पुढे येणार?”
या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांसमोर तरुण आणि नवोदित उमेदवारांनी कडवी टक्कर दिली आहे. विशेष म्हणजे दोन मोठ्या राष्ट्रीय पक्षांची समीकरणे या नव्या उमेदवारांमुळे ढवळून निघालेली दिसत आहेत. काही उमेदवार जाहीरपणे मोर्चेबांधणी करत आहेत, तर काही जण घराघरांत जाऊन आतून मतदार संपर्क साधत आहेत. अनेकांनी स्थानिक नेत्यांशी आधीच हातमिळवणी करत EVM मधील स्पर्धाही वाढवली आहे. त्यामुळे या निवडणुकीचे चित्र अत्यंत रंगतदार झाले आहे.
नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आणि त्यांचे चिन्ह
आगदा रंजिता पवनकुमार — टोपली
ढोके नैना धीरज — मशाल
दुर्गम शारदा मोहन — कमळ
देशकर रीता फकरू — किटली
पाटील आरती स्नेहदीप — हत्ती
सोनटक्के दीप्ती सुजित — हात
प्रभागनिहाय उमेदवारांची यादी
प्रभाग क्र. १ (अ)
चाहांदे विद्या अरविंद (हात)
तगरपवार प्रेमा गुरुदास (कमळ)
सारसर शुभांगी विवेक (घड्याळ)
प्रभाग क्र. १ (ब)
आत्राम संजय (कंगवा), कुमार शरद (तुतारी वाजवणारा माणूस), तालनपल्ली दशरथ (दूरदर्शन), दामेर विशाल (कमळ), सिद्दीकी साजिद (पतंग), सिंग रविशा (घड्याळ)
प्रभाग क्र. २ (अ)
कन्नूर सूरज (हात), गोडशेलवार राजुकुमार (कमळ), वनकर विशाल (गॅस सिलेंडर)
प्रभाग क्र. २ (ब)
इसारप सरिता (कमळ), पराते सारिका (हात), मेश्राम माला (कपाट)
प्रभाग क्र. ३ (अ)
गोंहोकार लता (मशाल), पानघाटे आशा (हात), लूटे सुचित्रा (कमळ)
प्रभाग क्र. ३ (ब)
गोहणे शिवसाजन (कमळ), प्रोद्दातुरी राजीरेड्डी (हात), बंडी प्रणयकुमार (तुतारी), लट्टा महेश (मशाल)
प्रभाग क्र. ४ (अ)
धोंगडे रघुनाथ (मशाल), बोडे विवेक (कमळ), मासिरकर गजानन (हात)
प्रभाग क्र. ४ (ब)
आमटे सारिका (मशाल), केतकी घोरपडे (हात), रामटेके पुष्पा (कंगवा), सातपुते चेताली (कमळ)
प्रभाग क्र. ५ (अ)
कोहळे रूपेश (कमळ), पचारे रोशन (हात), बोबडे तुषार (घड्याळ), बोडे सर्वेश (फलंदाज)
प्रभाग क्र. ५ (ब)
झाडे शारदा (तुतारी), नगराळे प्रतिमा (शिटी), सरोकार अर्चना (हात)
प्रभाग क्र. ६ (अ)
कलवल श्रुतिका (हात), गोलला सुजाता (तुतारी), चंदाबहेश मोनिका (कपाट), तक्कल्ला कविता (कमळ), पाटील दुर्गा (मशाल)
प्रभाग क्र. ६ (ब) — सर्वाधिक उमेदवार असलेला प्रभाग
गुडला श्रीनिवास (छत्री), गुप्ता उमेश (धनुष्यबाण), वर्मा राजकुमार (मशाल), पिट्ठलवार दिलीप (हात), गोसकुला श्रीनिवास (घड्याळ), त्रिवेणी पद्मा (गॅस सिलेंडर), नुने संतोष (कमळ), डब्बावर दत्तात्रय (तुतारी), भोस्कर प्रमोद (दूरदर्शन), भंडारी अनूप (फळा), लट्टा महेश (फलंदाज), शेख शामिउद्दीन (कॅमेरा)
प्रभाग क्र. ७ (अ)
चौहान शिवकुमार (घड्याळ), निषाद श्रीप्रकाश (हात), पिंपळकर गणेश (कमळ)
प्रभाग क्र. ७(ब)
खैरे सरिता (हात), तिवारी मधु (कमळ), सिंग मौसम (घड्याळ)
प्रभाग क्र. ८ (अ)
आत्राम शीतल (कमळ), उईके मनिषा (मशाल), पेंदोर सुनीता (हात)
प्रभाग क्र. ८ (ब)
चांदेकर अनिरुद्ध (बासरी), ठाकरे निशांत (मशाल), पाटील सुषमा (शिटी), बोबडे प्रकाश (कमळ), बोंडे सतीश (कपाट), सय्यद समीर (पतंग), सिद्दीकी नुरुल (हात)
प्रभाग क्र. ९ (अ)
कांबळे नंदा (हार्मोनियम), रिता कोवले (घड्याळ), चिवंडे निळा (कप-बशी), पाटील स्नेहा (मशाल), मोरपाका मीना (कमळ), कंचनदेवी सुरजकुमार (हात)
प्रभाग क्र. ९ (ब) — अत्यंत चुरशीचा प्रभाग
आगदारी पृथ्वीराज (तुतारी), कांबळे प्रमोद (शिटी), कुटेमाटे गणेश (दूरदर्शन), कुमरवार शामराव (ट्रक), कोंडगुरला सिद्धार्थ (हत्ती), खनके पुंडलिक (घड्याळ), गोमासे तुकाराम (कपाट), गोरघाटे प्रज्योत (गॅस सिलेंडर), चांदेकर सदानंद (छत्री), डांगे महेश (धनुष्यबाण), ढवस वैशाली (कमळ), बांदुरकर सुधाकर (हात), बोबडे चेतन (मशाल), रामटेके प्रतीक (ट्रॅक्टर)
प्रभाग क्र. १० (अ)
जीवने जनार्दन (हात), धोटे पंकज (कपाट), पाईकराव सुरेश (शिटी), पाझारे योगराज (गॅस सिलेंडर), पाझारे हेमंत (कमळ), बोरकर अमित (मशाल), मुंडे सोमेश्वर (तुतारी), वाघमारे संजयोग (छत्री)
प्रभाग क्र. १० (ब)
गाताडे आनंद (मशाल), चिकनकर वैशाली (हात), चौधरी नीतू (कमळ)
प्रभाग क्र. ११ (अ)
आगदारी पवनकुमार (हात), कोवळे क्षितिज (तुतारी), गायकवाड बंडू (मशाल), जंजर्ला विनोद (कपाट), ठाकरे रवी (धनुष्यबाण), पाइकस्कर शरद (शिटी), महानकली मनमोहन (रोलर), माशिसरकर आशिष (कमळ), सोनुले मनोज (घड्याळ)
प्रभाग क्र. ११ (ब) – महिला राखीव
इंगळे दिपाली (मशाल), घुले पल्लवी (हात), पाटील सुनीता (कमळ)
यंदाची घुग्घूस नगरपरिषद निवडणूक अत्यंत रंजक आणि स्पर्धात्मक ठरणार आहे. ज्येष्ठ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून नवे चेहरे जनतेचे लक्ष वेधून घेत आहेत. कोणत्या प्रभागात कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याचा निकाल २१ डिसेंबरला स्पष्ट होईल.



