ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कापूस वेचतानाच हृदय विकाराचा झटका ; युवा शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू

चेक कोसंबी नं.१ येथील घटना 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

पोंभूर्णा :- शेतातील कापूस वेचण्याचे काम सुरू असतानाच अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दि.१४ डिसेंबरला दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. वैभव ऊराडे (वय ४०) रा.चेक कोसंबी नं.१ असे मृतक युवा शेतकऱ्याचे नाव आहे.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मृतक युवा शेतकरी आपल्या शेतात कापूस वेचत असताना दुपारी बारा अचानक खाली कोसळला.कापूस वेचणारे मजूर व कुटुंबातील लोकांनी तातडीने मदतीचा प्रयत्न केला व पोंभूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात नेले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. प्राथमिक तपासणीत हृदयविकाराचा झटका आल्याचे कारण समोर आले आहे.या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.अवघ्या तरुण वयात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे. शेतीकामातील ताणतणाव,शारीरिक थकवा आणि अनियमित आरोग्यतपासणी यामुळे अशा घटना वाढत असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे.

मृतकाचे मागे पत्नी,दोन मुली,आई -वडील,भाऊ असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये