ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अखेर महाराष्ट्र शासनाने रिंगरोडचा वार्षिक मूल्यदर रद्द केला

चांदा ब्लास्ट

अखेर महाराष्ट्र शासनाने रिंगरोडचा वार्षिक मूल्यदर रद्द केला आहे. रिंग रोडचा वार्षिक मूल्यदर रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून या महत्त्वपूर्ण निर्णयामध्ये नगरसेवकपदाच्या काळात इंजि. सुभाष कासनगोटटूवार यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यासह लोकप्रिय आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांच्या अथक प्रयत्नांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे.

सन 2017 मध्ये नागरिकांच्या आशीर्वादाने इंजि. सुभाष कासनगोटटूवार नगरसेवक म्हणून निवडून आले. त्या काळात निर्माण नगर, महेश नगर, वाणखेडे वाडी, वृंदावन नगर आणि राष्ट्रवादी नगर येथील नागरिकांनी रिंग रोड रद्द करण्यासाठी ठराव सभागृहात मांडावा अशी लेखी विनंती त्यांना दिली होती. नागरिकांच्या या मागणीचा आदर राखून त्यांनी तो ठराव सभागृहात मांडला व सभागृहाने एकमताने मंजूर करून शासनाकडे पाठविला. त्या काळच्या माननीय महापौर सौ. राखी ताई कांचर्लावार यांनी पूर्ण सहकार्य केले.

यानंतर इंजि. सुभाष कासनगोटटूवार यांनी महाराष्ट्र शासनाशी सातत्याने पत्रव्यवहार करून या विषयाचा पाठपुरावा केला. त्याचबरोबर चंद्रपूरचे लोकप्रिय आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित विभागांशी सातत्याने संवाद साधून नागरिकांच्या न्याय्य मागणीला सबळ पाठिंबा दिला. या प्रयत्नांच्या जोरावर शासनाचे लक्ष या प्रकरणाकडे वेधले गेले.

या रिंग रोडमुळे निर्माण नगर, महेश नगर, वाणखेडे वाडी, वृंदावन नगर, राष्ट्रवादी नगर आदी परिसरातील सुमारे ७०० ते ८०० नागरिकांची घरे धोक्यात आली असती. त्यामुळे हा निर्णय हजारो नागरिकांसाठी प्रचंड दिलासा देणारा ठरला आहे.

या संपूर्ण प्रक्रियेत रिंग रोड विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष श्री. वसंतराव धंदरे यांनी नागरिकांना एकत्र करून सातत्याने योग्य मार्गदर्शन केले. त्यांच्या नेतृत्वामुळे नागरिकांचा आवाज शासनापर्यंत ठळकपणे पोहोचला.

मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्जी फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना दिल्या आणि अखेर शासनाने रिंग रोडचा वार्षिक मूल्यदर रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला.

नागरिकांच्या हितासाठी इंजि. सुभाष कासनगोटटूवार यांनी केलेला सातत्यपूर्ण लढा, आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांचे ठाम प्रयत्न तसेच नागरिकांच्या एकजुटीमुळे या विषयाला यश मिळाले असून पुढील काळातही विकासकामांसाठी असेच प्रयत्नशील राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये