बहुजन समाज पार्टीचे माजी नगरसेवक सुधीर कारंगल यांचा भाजपमध्ये प्रवेश
प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम

चांदा ब्लास्ट
नागपूर येथे भारतीय जनता पक्षात महत्त्वपूर्ण प्रवेश घडला. बहुजन समाज पार्टीचे इंडस्ट्रियल प्रभागाचे सलग तीन दा नगर सेवक राहिलेले माजी नगरसेवक सुधीर कारंगल यांनी आज (शुक्रवार) भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. या कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, आमदार किशोर जोरगेवार, महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, प्रदेश कार्यकारणी सदस्य तुषार सोम, तसेच प्रकाश देवतळे, सुमित गुप्ता, हर्ष जयस्वाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
गेल्या काही महिन्यांमध्ये विविध पक्षांतील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत. कॉंग्रेससह इतर पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केला असून, पक्षाचा संघटनात्मक विस्तार वेगाने वाढत आहे.
आज सुधीर कारंगल यांनीही ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी पक्ष प्रवेश करून भाजपच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त केला. त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाची ताकद अधिक मजबूत होणार आहे.
यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, भारतीय जनता पक्ष हा सामान्य कार्यकर्त्यांच्या श्रमांवर उभा असलेला पक्ष आहे. आम्ही विकास, पारदर्शकता आणि लोकहित यांना प्राधान्य देणारे समाजकारण करतो. सुधीर कारंगल यांसारख्या समाजाभिमुख नेत्याचा पक्षात प्रवेश हा आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये विविध पक्षांतील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आमच्यात सामील झाले आहेत. हा विश्वास आम्ही विकासकामांद्वारे आणि जनसेवेच्या माध्यमातून मिळवला आहे. असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.



