ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निमगाव येथील बसस्थानकावर बंदिस्त नाली, दुभाजक व इलेक्ट्रिक पोल बसविण्यात यावे – भाजपा तालुकाध्यक्ष किशोर वाकूडकर

पायाभूत सुविधा विकास महामंडळाला निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

       तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक 29 व्याहाड- निमगाव- मुडझा- गांगलवाडी या मार्गाचे महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालय नागपूर द्वारे सिमेंट काँक्रेटीकरण बांधकाम चालू आहे, निमगाव बसस्थानकावर बंदिस्त नाली, दुभाजक व इलेक्ट्रिक पोल बसविण्यात यावे अशी मागणी भाजपा तालुका सावलचे अध्यक्ष किशोर वाकूडकर यांनी कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन मागणी केली आहे.

  निमगाव हे गाव तालुक्यातील मोठे गाव असून या बसस्थानकावर चौरस्ता असून या ठिकाणी अनेक प्रवाशी उभे असतात तसेच अनेक वाहने नास्ता व विश्रांती करिता थांबा देत असतात त्यामुळे येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला बंदिस्त नाली, मध्यभागी दुभाजक व त्या दुभाजकांमध्ये इलेक्ट्रिक पोल बसविण्यात यावे कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालय नागपूर येथे भेट घेऊन निवेदणाद्वारे भाजपा तालुकाध्यक्ष किशोर वाकूडकर यांनी मागणी केली.

यावेळी सरपंच गीताताई लाकडे, भाजपा तालुका उपाध्यक्ष पुनम झाडे, किशोर खेडेकर सदस्य ग्रामपंचायत, सुरज किनेकर, लंकेश लाकडे, हेमंत झाडे आदी उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये