ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्ट्रीट लाईट पोलला भरधाव वाहनाची धडक 

सोलार प्रणालीचे नुकसान 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

शहरातील चिखली रोडवरील दिनदयाळ शाळेसमोर भरधाव चारचाकी वाहनाने स्ट्रीट लाईट पोलला जोरदार धडक देत मोठे नुकसान केल्याची घटना 10 डिसेंबर रोजी रात्री 10.30 च्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी विशाल सैवर (वय 38, विद्युत अभियंता, न.प. देऊळगाव राजा, रा. संभाजीनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, MH-19-BU-1665 क्रमांकाची फोर व्हिलर गाडी भरधाव व निष्काळजीपणे चालविण्यात आली. या गाडीने रोडलगत असलेल्या स्ट्रीट लाईटच्या पोल क्रमांक 29 ला जोरदार धडक दिली. धडकेमुळे 9 मीटर लांबीचा पोल कोसळून त्यावरील 2 सोलार लाईट, 2 बॅटऱ्या, सोलार पॅनल, 2 ब्रॅकेट, आयर्न प्लेट, पॅनल बोर्ड यासह अन्य साहित्यांचे एकूण ₹2,52,755/- मूल्याचे नुकसान झाले असल्याचे नगरपरिषद देऊळगाव राजा यांनी कळविले.घटनेनंतर वाहनचालक पसार झाला.

फिर्यादीच्या तोंडी अहवालावरून अज्ञात चालकाविरुध्द कलम 281, 324(2) भा.दं.सं. (BNS) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक ब्रम्हागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ नारायण गीते करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये