ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एसटी बसची पिक अपला धडक

दोन मजूर महिला जागीच ठार तर पाच गंभीर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

पोटाची टीचभर खळगी भरण्यासाठी पर राज्यातून देऊळगाव राजा येथे मजुरीसाठी आलेल्या महिलांच्या पिकअप ला पाठीमागून येणाऱ्या प्रवासी बसने जोराची धडक दिली यामध्ये दोन महिला मजुरांचा जाग्यावर मृत्यू झाला तर पाच महिलांना गंभीर अवस्थेत जालना येथे हलवले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. सविस्तर वृत्त असे की,देऊळगाव राजा येथील कापूस जिनिंग मध्ये परराज्यासह अमरावती जिल्ह्यातून मजुरीसाठी आलेल्या महिलांवर 11 डिसेंबर रोजी सकाळी साडेसात दरम्यान काळाने घाला घातला. शहरातील जाफराबाद रोड येथे कापूस जिनिंग फॅक्टरी आहे त्या ठिकाणी पोटाची टीचभर खळगी भरण्यासाठी काही कुटुंब तेथे वास्तव्यास आहे.

सद्यस्थितीत काम नसल्याने आठ ते दहा महिला ह्या कापूस वेचण्यासाठी तालुक्यातील पिंपळगाव येथे मालवाहू पिक अप एम एच 38 E 2082 मध्ये जाण्यासाठी चढत असताना जाफराबाद जालना बस क्रमांकMH 20-BL-2276 च्या चालकाने पाठीमागून जोरदार धडक दिली. यामध्ये दोन महिला मजूर जाग्यावर ठार झाल्या यामध्ये1) मायाबाई सुरज काजले.वय 32 वर्ष मुक्काम पोस्ट -रामखेरा,तालुका खगणार,जिल्हा बुऱ्हानपूर. 2) रिचाय काल्या कासदेकर- वय 72 वर्ष मुक्काम पोस्ट..नांदुरी तालुका धारनी जिल्हा अमरावती या दोन महिला मजूर जागेवर ठार झाल्या. घटनेची माहिती मिळताच डॉक्टर अक्षय गुठे, चालक सुभाष कणखर, समाधान आघाव यांनी घटनास्थळावर धाव घेतली. अपघाताची भीषणता एवढी होती की दोन्ही मजूर महिलांचे मृतदेह अक्षरशः चुराडा झाले होते.

गंभीर जखमी महिला1) सुहाना प्रतिराम इपने वय सोळा वर्ष राहणार नांदुरी तालुका धारणी,2) खुशबू बबलू पालवी वय 17 वर्ष मुक्काम पोस्ट तागमला तालुका खागनर जिल्हा बुऱ्हानपूर,3) सुलोचना हारासिंग सहारे वय 35 वर्ष राहणार भगवान पुरा तालुका नांदोरी तालुका धारणी , 4) पुरुषाने मंगल इपने वय 22 वर्ष भगवानपुरा तालुका नांदुरी, तालुका धारणी,5) नर्मदा सोनू इपने वय 45 वर्ष राहणार नांदुरी तालुका धारणी जिल्हा अमरावती या गंभीर जखमी झाल्या त्यांना ग्रामीण रुग्णालयात आणले असता गंभीर अवस्थेत पुढील उपचारासाठी जालना येथे घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक ब्रम्हागिरी यांनी पोलीस पथकासह घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला.

या संदर्भात देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला मर्ग दाखल करण्यात आला असून पुढील तपासात गुन्हे दाखल करण्यात येतील असे पोलीस निरीक्षक ब्रह्म गिरी यांनी सांगितले

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये