Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

पतंजलि योग समिती ब्रम्हपुरी- चे वतिने आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस 2024 संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रम्हपुरी :- पतंजलि योग समिती व जिल्हा परिषद हायस्कुल ब्रम्हपुरी यांचे संयुक्त विद्यमाने प्रथम आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस जिल्हा परिषद हायस्कुल ब्रम्हपुरी येथे भगवान पालकर यांचे मार्गदर्शनात संपन्न झाला.

ध्यानाचे महत्व समजवुन सांगताना भगवान पालकर यांनी योग शिक्षक व विद्यार्थांना अष्टांगयोग, ध्यान व भारत वसुदेव कुटुंबकम (संपुर्ण विश्व एक परिवार ) ची भावन, मानव कल्याण, समस्त विश्वात शांति व समरसता वाढविण्यासाठी भारताची वसुधैव कुटुंबकम (संपूर्ण विश्व एक परिवार) या संकल्पनेनुसार. आंतरराष्ट्रीय ध्यान दिवसाचे महत्व समजवुन सांगितले. संयुक्त राष्ट्रसंघाचे बैठकीत 193 सदस्य देशांनी आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस प्रस्ताव मंजूर केला. नियमीत योग ध्यान केल्याने आयू मर्यादा वाढते, तनाव, अवसाद व चिंता कमी होते, एकाग्रता, सकारात्मकता, भावना, व ध्यान वाढते, अवसाद व उदासीनता ची भावना कमी होते.

नकारात्मक विचार सकारात्मक मध्ये परिवर्तन होतात व याचा दीर्घकालीन लाभ व परीणाम होतो. या कार्यक्रमास, यशवंतजी तलमले, डाॅ. लोकेश मुळे, तुळशीराम सपाटे, तेजराम येरणे, जितेंद्र कुथे, डाॅ.नरेश बावनकुळे, भालचंद्र नाकाडे तसेच समस्त शिक्षक वृंद, पवन रामटेके सर, रामचंद्र दिनगुलवार सर, अंबादास सुरपाम सर, अनिल घोनमोडे सर, श्रीमती अश्विनी सहारे , श्रीमती आशा खोब्रागडे व विद्याथीॅ यांचा सहभाग होता. रुद्राक्षी राऊत, दृष्टी नाकतोडे यांनी कठीण आसनांचे प्रात्यक्षिक केले. यशवंतजी तलमले यानी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये