ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रेरणा महाविद्यालयात “देशभक्तीपर कवीसंमेलन”

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालयात “देशभक्तीपर कविसंमेलन” मोठ्या उत्साहात पार पडले. या सोहळ्यात ख्यातनाम कवींनी आपल्या ओजस्वी काव्यपंक्तींनी वातावरण भारून टाकले.

कवीसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून ख्यातनाम विद्रोही कवी प्रा.प्रशांत खैरे यांची उपस्थिती होती. तर उदघाटक म्हणून देशभक्तीपर कविताचे धनी प्रा. दिनकर झाडे उपस्तिथ होते. कविसंमेलनाचे स्वागताधक्ष्य म्हणून नामदेव ठेंगणे यांनी स्थान स्वीकारले.

कवी संमेलनाचे उदघाटन राष्ट्रगीताने झाले . त्यानंतर “सर्फरोशी की तमन्ना”, “वंदे मातरम्” अशा घोषणांनी सभागृह दुमदुमून गेले. प्रत्येक कवीने देशभक्ती, शौर्य, बलिदान आणि ऐक्य या विषयांवरील कविता सादर करून श्रोत्यांच्या मनात देशप्रेमाची ज्योत प्रज्वलित केली.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कविसमेलनाचे आयोजक महाविद्यालयाचे प्राचार्य नाणेश्वर धोटे, युवा कवी प्रा.एजाज शेख, प्रा.दुर्गावती कुबाळकर, प्रा. मंगेश रणदिवे, प्रा.अमोल चिकराम, प्रा श्रीकांत घोरपडे,प्रा. प्रवीण आंबटकर,प्रा. अंजना पवार यांची उपस्थिती होती.

प्रा. प्रशांत खैरे यांच्या यांच्या ‘तिरंगा प्रश्न विचारतोय’ या कवितेला प्रेक्षकांनी उभे राहून दाद दिली, तर युवा कवी प्रा.एजाज शेख यांच्या जोशपूर्ण कवितांनी तरुणाईत प्रेरणा निर्माण केली.प्रा. दिनकर झाडे यांच्या “आजचे संविधान” या कवितेतून रसिकांच्या मनात देशप्रेम जागृत केले. मयूर ठाकूर, शेखर कोहपरे, श्रुती तिखट, तन्वी खेवले, गणेश सोळंके, हर्षल मांडवकर,या विद्यार्थ्यांनी आपल्या देशभक्तीपर स्वालिखित कविता सादर केल्या.

प्रास्तविक प्राचार्य नानेश्वर धोटे यांनी तर सूत्रसंचालन प्रा.प्रवीण आंबटकर यांनी प्रभावी शैलीत केले. आभार प्रा. दुर्गावती कुबाळकर यांनी केले.समारोपप्रसंगी स्वागताधक्ष्य नामदेव ठेंगणे यांनी तरुण पिढीने देशसेवेसाठी सदैव तत्पर राहावे, असे आवाहन केले. उपस्थितांनी “भारत माता की जय”च्या घोषणांनी कार्यक्रमाचा समारोप केला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये