ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घुग्घुसात काँग्रेसतर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट

घुग्घुस, चंद्रपूर : देशाच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त घुग्घुस काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसंपर्क कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी 8:30 वाजता काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकविण्यात आला.

राष्ट्रध्वजाला सामूहिक मानवंदना देण्यात आली तसेच उपस्थितांनी राष्ट्रगीत गायन करून शहीद वीरांना श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रमानंतर उपस्थित नागरिकांना लाडूंचे वाटप करण्यात आले.

यावेळी नागरिकांशी संवाद साधताना राजुरेड्डी म्हणाले की, “सध्याच्या काळात भारतीय जनता पार्टी निवडणूक आयोगाशी हातमिळवणी करून देशातील लोकशाही धोक्यात आणत आहे. या अघोषित हुकूमशाहीविरोधात देशातील नागरिकांनी एकजुटीने लढा देणे आवश्यक आहे.” असे ते म्हणाले.

या कार्यक्रमाला काँग्रेस नेते सैय्यद अनवर, ज्येष्ठ नेते शामराव बोबडे, जिल्हा महासचिव अलीम शेख, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, जिल्हा सचिव अजय उपाध्ये, इंटक जिल्हा उपाध्यक्ष शहजाद शेख, तालुका सचिव विशाल मादर, तालुका उपाध्यक्ष श्रीनिवास गुडला, ज्येष्ठ नेते शेखर तंगडपल्ली, सामाजिक कार्यकर्ते फिरोज शेख, महिला जिल्हा उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद, जिल्हा महासचिव पद्मा त्रिवेणी, शहर महिला कार्याध्यक्ष दिप्ती सोनटक्के, जिल्हा सचिव दुर्गा पाटील, पुनम कांबळे, प्रीती तामगाडगे, भाविका आटे, वैशाली दुर्योधन, मंगला बुरांडे, सरस्वती कोवे, जोया शेख यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

तसेच देविदास पुनघंटी, बालकिशन कुळसंगे, रोहित डाकूर, सुनील पाटील, दिपक पेंदोर, अरविंद चहांदे, निखिल पुनघंटी, दिपक कांबळे, कुमार रुद्रारप, कपील गोगला, शहशाह शेख, सचिन नागपुरे, अंकुश सपाटे, रंजित राखुंडे यांच्यासह मोठ्या संख्येने सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बांधव व नागरिक सहभागी झाले होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये