ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माजी खासदार मा.श्री नरेशबाबू पुगलिया यांच्या मार्गदर्शनात युवा नेते श्री राहुलबाबू पुगलिया यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण

७९ व्या भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्य विदर्भ किसान मजदूर कॉग्रेस जि. चंद्रपूरच्या वतीने संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

संपूर्ण देशात भारतीय स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. दरवर्षी प्रमाणे इंदिरा गांधी किसान मजदूर भवन चंद्रपूर येथे १५ ऑगस्ट २०२५ रोजी माजी खासदार मा.श्री नरेशबाबू पुगलिया यांच्या मार्गदर्शनात विदर्भ किसान मजदूर कॉग्रेस चंद्रपूरच्या वतीने ७९ व्या भारतीय स्वातंत्र्यदिनी युवा नेते श्री राहुलबाबू पुगलिया यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

     देशावर इंग्रजांनी तब्बल दीडसे वर्षे राज्य केले. इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला स्वतंत्र करण्यासाठी महात्मा गांधी यांच्यासह अनेक थोर महापुरुषांनी त्याग, बलिदान दिले. त्या त्यागातून देश स्वंतत्र झाला. त्यानंतर देशाला उभे करण्यात भारताचे पहिले पंतप्रधान स्व. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशाला पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून संपूर्ण देशात विकासाची सुरूवात केली. आज ७९ वर्षात आम्ही एक मजबूत भारत, आझाद भारत, धर्मनिरपेक्ष भारत म्हणून आम्ही पाहत आहो. देशाची सिमा सुरक्षा आमचे सैनिक साभाळत आहे.

तसेच शहरी व ग्रामिण भागाची सुरक्षा आमचे पोलीस दल सांभाळत आहे म्हणून आम्ही सुरक्षित आहो. आज देश विकासाचा प्रगतीपथावर पुढे जात आहे. यांच श्रेय ७९ वर्षात आमच्या पूर्वजनांची मेहनत व दुरदुष्टी आहे. जे केंद्रात व राज्यात सत्तेत होते त्यांनी शहरात व ग्रामिण भागात विकासची कामे केली म्हणून आज देश विकासाच्या बाबतीत प्रगतीपथावर दिसत आहे. आज काही जातीयवादी शक्ती देशात अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहे. अशा जातीयवादी शक्तींना धडा शिकविण्याचे काम आपल्याला करावे लागेल व एक मजबूत भारत, अखंड भारत, धर्मनिरपेक्ष भारत राखण्याचे काम आपल्याला करायचे आहे. तिरंगा आपल्या देशाचा अभिमान व सन्मान आहे. तिरंगा आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देतो. असे प्रतिपादन राहुलबाबू पुगलिया यांनी केले.

याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांना व नागरिकांना नाश्ता व मिठाई वाटप करण्यात आले. यांनतर स्थानिक प्रियदर्शिनी चौकातील राष्ट्रमाता इंदिराजी गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला युवा नेते श्री राहुलबाबू पुगलिया यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहीली.

यावेळी कॉग्रेसचे विदर्भ किसान मजदूर कॉग्रेस जि. चंद्रपूर महासचिव तथा माजी नगरसवेक अशोक नागापूरे, शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक देवेंद्र बेले, कामगार नेते चंद्रशेखर पोडे, रामदास वाग्दस्कर, विरेंद्र आर्या, पंकज गुप्ता, अनिल तुंगीडवार, सुधाकरसिंह गौर, सायरा बानो, रतन शिलावार, बाबूलाल करुनाकर, गजानन दिवसे, अनंता हुड, अनिल तुंगीडवार, सुरेश बोडणे, अजय महाडोळे, सुमित नगराळे, व शेकडो नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये