कुपोषण पे सिधा वार हम सब है तैयार – पोषण आहाराची भेट देऊन मिलिंद गड्डमवार ह्यांचा जन्मदिवस साजरा
कुपोषण मुक्ती साठी सर्वांनी बाळू फाउंडेशन च्या कार्यात सहभागी व्हावे - अमित महाजनवार

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी
आशिष रैच राजुरा
राज्यात सर्वाधिक चिंतनीय विषय असलेल्या कुपोषणाविरुद्ध पंचायत समिती राजुरा येथे कार्यरत असलेले अमित महाजनवार ह्यांच्या संवेदनशील मनाने लढा देण्याचा मानस करून ‘बाळू’ ह्या संस्थेची स्थापना केली. कुपोषण निर्मुलनसाठी समाजाची मदत घेऊन समाजाला समर्पित करणे ह्या उद्देशाने स्थापन झालेल्या संस्थेच्या अध्यक्षांनी अथक प्रयत्नांनी केवळ राजुरा परिसरातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात संस्थेचे कार्य पोहचवून कुपोषण मुक्तीचा लढा सुरू केला. आपला अथवा परिवारातील व्यक्तींचा जन्मदिवस किंवा इतर कुठलेही आयोजन असल्यास कुपोषित बालकांच्या पोटी सकस पोषण आहाराची भेट पडावी ह्यासाठी मदत करण्याचे आवाहन करून सुरू झालेला लढा आता चळवळ बनला असुन शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा मुक्त पत्रकार मिलिंद गड्डमवार ह्यांनी आपल्या जन्मदिवसाचे औचित्य साधून दिनांक 9 डिसेंबर रोजी राजुरा येथील शिवसेना चौक अंगणवाडी क्रमांक 8 येथील एका बालकाला बाळू फाउंडेशनच्या कुपोषण पे सिधा वार हम सब है तैयार उपक्रमा अंतर्गत पोषण आहाराची बाळू भेट देण्यात आली.

पोषण आहार किट वितरण प्रसंगी अध्यक्ष अमित महाजनवार ह्यांनी कुपोषण मुक्ती साठी सर्वांनी बाळू फाउंडेशन च्या कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन केेले ह्यावेळी आशीष करमरकर, कल्याणी बावणे, भावना रागीट, वनिता टेकाम, पिंकी कंत्राजवार, आरती रागीट, बाळू चे अक्षय सुर्तेकर, अंगणवाडी सेविका दर्शना रागीट उपस्थित होते.



