ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

इव्हिएम मशीन ठेवण्यात आलेल्या स्ट्रांगरुमचा सायरन वाजल्याने धावपळ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

     भद्रावती नगरपरीषद निवडणुकिचीचे मतदान पार पाडल्यानंतर सर्व इव्हिएम मशिन्स शहरातील शासकीय औदयोगिक प्रशिक्षण केंद्राच्या स्ट्रांगरुम मधे कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आल्या.

मात्र दिनांक ९ ला सकाळी अचानक स्ट्रांगरुम मधील सायरन अचानक वाजु लागल्याने या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेची चांगलीच धावपळ ऊडाली.

अखेर वायर ल्युज पडल्यामुळे हा सायरन वाजल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेने सुटकेचा निश्वास सोडला. भद्रावती पालीकेचा निवडणूक निकाल २१ डिसेंबरला शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्थेच्या ईमारतीत जाहिर करण्यात येणार आहे.सर्व इव्हिएम मशिन्स या इमारतीच्या स्ट्रांगरुम मधे कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आल्या आहेत.सुरक्षेसाठी एसआरपीएफ जवानांची फौज,पुरेसे पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे.चोविस तास या ठिकाणी सक्षम अधिकाऱ्यांची पाळत आहे. याशिवाय येथे सीसीटिव्ही कैमेरे लावण्यात आले आहे. शिवाय काही गडबड झाल्यास सायरन वाजेल अशी व्यवस्था आहे. मात्र अचानक सायरन वाजल्याने सुरक्षा व्यवस्था अलर्ट झाली.

शोध घेतल्यनंतर सायरनचे वायर ढिले झाल्याने सायरन वाजल्याचे उघडकीस आले.त्यानंतर हा दोष तात्काळ दुर करण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये