ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
जेना येथून बैलबंडी व ट्रॅक्टरचे लोखंडी पार्ट चोरणाऱ्या दोन आरोपींना अटक
भद्रावती पोलिसांची कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती तालुक्यातील जेना येथून बैलबंडी तथा ट्रॅक्टरचे लोखंडी पार्ट चोरणाऱ्या दोन आरोपींना भद्रावती पोलिसांनी अटक केली आहे. सदर कारवाई भद्रावती पोलिसांतर्फे करण्यात आली. विनोद उर्फ बिल्लू देवगडे वय 58 वर्ष, राहणार भद्रावती व वैभव महादेव दगडी, वय 29 वर्षे, राहणार चंद्रपूर असे या अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्याकडून दोन लक्ष 50 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर लोखंडी साहित्याची चोरी झाल्याची तक्रार पंकज देवतळे, राहणार जेना यांनी भद्रावती पोलिसात केली होती. त्यावरून तपास यंत्रणा राबवीत भद्रावती पोलिसांनी सदर चोरट्यांना अटक केली.



