ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
रब्बी हंगामातील पिकासाठी खडकपूर्णा धरणाचे पाणी त्वरीत सोडा _ माजी आ. डॉ शशीकांत खेडेकर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
खडकपूर्णा धरणाचे पाणी पाटा द्वारे त्वरीत सोडण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे, शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात पिकांची लागवड केली आहे, पाणी न मिळाल्यास पिकांचे नुकसान होऊन आर्थिक नुकसान होणार आहे, ते टाळण्यासाठी पाटा द्वारे पाणी त्वरीत सोडण्याची कार्यवाही करावी अशी मागणी माजी आमदार डॉ शशीकांत खेडेकर यांनी कार्यकारी अभियंता, खडकपूर्णा प्रकल्प, देऊळगाव राजा यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.
कोणत्या पाटा द्वारे, कोणत्या भागात किती दिवस पाणी सोडण्यात येणार आहे याचे वेळापत्रक त्वरीत निर्गमित करण्यात यावे अशी मागणीही केली आहे.



