६९० ग्राम प्रिमॅच्युअर नवजात बाळाचे कारोटकर हॉस्पिटल, वर्धा येथे यशस्वी उपचार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पायल (नाव बदललेले) यांना लग्नानंतर तब्बल दहा वर्षांनी IVF च्या चौथ्या प्रयत्नात गर्भधारणा झाली. मात्र गर्भधारणेच्या सातव्या महिन्यातच प्रसूती होण्याची वेळ आली आणि सीझेरियन पद्धतीने अवघे ७५० ग्राम वजनाचे अत्यंत प्रिमॅच्युअर बाळ जन्माला आले. जन्मताच बाळाला तातडीने *कारोटकर हॉस्पिटल*, बॅचलर रोड, वर्धा येथे नवजात शिशु तज्ञ *डॉ. सागर अजयराव कारोटकर* यांच्या देखरेखीखाली NICU मध्ये दाखल करण्यात आले.
जन्मानंतरच्या पहिल्या काही दिवसांत बाळाला अत्याधुनिक व्हेंटिलेटर सपोर्टची गरज भासली. रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम, फीडिंग इंटोलरन्स, निमोनिया अशा गंभीर समस्यांना सामोरे जाताना बाळावर मेंदू, हृदय, डोळे, कान तसेच अन्ननलिकेच्या सर्व आवश्यक तपासण्या करण्यात आल्या. फुफ्फुसांची वाढ अपुरी असल्याने सर्फॅक्टन्ट थेरपी देण्यात आली.
डॉ. सागर कारोटकर, डॉ. शाम लोहिया आणि अनुभवी NICU टीम यांनी दिवस-रात्र परिश्रम घेऊन या अतिदुर्मिळ व गुंतागुंतीच्या प्रकरणाशी झुंज दिली. सातत्यपूर्ण उपचार आणि काळजीपूर्वक मॉनिटरिंगमुळे अखेर ५६ दिवसांच्या खडतर उपचारानंतर बाळाला डिस्चार्ज देण्यात आला. त्या वेळी त्याचे वजन १७५० ग्राम झाले होते. कुटुंबीयांनी संपूर्ण हॉस्पिटल टीमचे मनःपूर्वक आभार मानले.
*कारोटकर हॉस्पिटलने* पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की प्रामाणिक, बारकाईने केलेले आणि कौशल्यपूर्ण उपचार यामुळे अत्यंत नाजूक प्रिमॅच्युअर बाळांचीही यशस्वी काळजी घेता येते.
*डॉ. सागर अजयराव कारोटकर म्हणाले* :
“IVF उपचारांमुळे प्रिमॅच्युअर बाळांची संख्या वाढत आहे. अत्याधुनिक व्हेंटिलेटर केअर, सर्फॅक्टन्ट थेरपी आणि सक्षम NICU व्यवस्थेमुळे अशा बाळांना जीवनदान मिळू शकते. प्रिमॅच्युअर बाळांच्या डोळे, कान, मेंदू व इतर अवयवांची विशेष देखभाल केल्यास त्यांचा बौद्धिक विकास सामान्य बाळांप्रमाणे होऊ शकतो.”
— *डॉ. सागर अजयराव कारोटकर*
प्रभारी नवजात शिशु विशेषज्ञ, N.I.C.U.
कारोटकर हॉस्पिटल, बॅचलर रोड, वर्धा



