गुन्हे

महिलेसोबत असभ्य कृत्य करून विनयभंग

त्रस्त महिलेने सोशल मीडिया, फेसबुक आणि मोबाईलवर अश्लील मेसेज येत असल्याची केली तक्रार

चांदा ब्लास्ट :

अतुल कोल्हे भद्रावती :-

माजरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील येत असलेल्या पाटळा येथे 26 वर्षीय महिलेसोबत विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे.

पाटाळा गावातील महिलेच्या मोबाईलवर आणखी मेसेज पाठवून शारीरिक संबंध ठेवण्यास सांगून विनयभंग केल्याच्या या घटनेच्या तक्रारीवरून माजरी पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

कौशल संतोष माळवे, वय १९ वर्षे, रा. पाटाळा नवीन वस्ती असे आरोपीचे नाव आहे. माजरी पोलीस स्टेशनचे अजितसिंग देवरे यांना मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी कौशल संतोष माळवे याने फिर्यादी महिलेकडे लैंगिक सुखाची मागणी करून तिच्या फेसबुक आयडीवर वारंवार अश्लील बोलणे, मोबाईलवर मेसेज करून, अश्लील हावभाव करून लज्जास्पद वर्तन करून छेडछाड केली. सह. माजरी पोलिसांनी UP C-82/2023 कलम 354 A 354 D भादवी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.  वृत्त लिहिपर्यंत आरोपी पकडला गेला नव्हता.

वरोरा उपविभागीय अधिकारी आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली माजरी पोलीस ठाण्याचे अजितसिंग देवरे, नीता परचाके अधिक तपास करीत आहेत

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये