दारूबंदी कायद्यान्वये रेड
एकूण 1 लाख 55 हजारांवर माल जप्त
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
स्था. गुन्हे शाखा वर्धा द्वारे पो. स्टे. सेलू हद्दीत अवैध धंद्यावर कारवाई ची मोहीम राबवून प्रो. रेड केला असता 1.मनोज पाईकराम राऊत वय. 28 वर्ष रा. हिगनी,धामणगाव तालुका. सेलू जिल्हा .वर्धा आरोपीस ताब्यात घेऊन 2. अनुप राय रा. हिंगणी,सेलू, वर्धा(पसार) आरोपी मोक्यावरून पसार झाला.मोक्याच्या ठिकाणाहून मोहा दारू काढण्याकरिता लागणारे साहित्य व चालू भट्टी आणि भट्टीकरिता लागणारा कच्चा मोहा रसायन सडवा तयार करण्याकरिता हिंगणी जंगल शिवराच्या ठिकाणी ठेवून असलेले वर नमूद ड्राम मिळून आले.
एकुण जुमला किमंत 1,55,600 /- रु. चा मुद्देमाल मिळून आल्याने मौक्का जप्ती पंचनाम्या प्रमाने जागीच जप्त करून नाश करण्यात आला. 1.मनोज पाईकराम राऊत वय. 28 वर्ष रा. हिगनी ,धामणगाव तालुका. सेलू जिल्हा.वर्धा आरोपीला पो. स्टे. सेलू, यांच्या ताब्यात देण्यात आले व आरोपी विरुद्ध कलम 65 (BCEF), म.दा.का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.