Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा कडुन घरफोडीचे एकुण ०४ गुन्हे उघडकीस

अट्टल आरोपीतांकडुन गुन्हयातील ३ लाख ५५ हजारांवर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

फिर्यादी नामे रोशनी मनमित हरकुट रा. कताणे ले-आउट, वर्धा यांनी पो स्टे. रामनगर येथे तक्रार दिली की, व ईतर दिनांक २६/१०/२०२४ रोजी ने परीवारामह बाहेरगांवी गेले असता दिनांक २७/१०/२४ रोजी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फिर्यादीचे घराचे व बेडरूमचे लॉक तोडून वेडरूमधील आलमारी मध्ये ठेवलेले सोन्याचे दागिणे व नगदी रूपये चोरून नेल्याने पो स्टे. रामनगर येथील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गरफोडी दाखल गुन्हे संबंधाने वर्धा शहर परीसरात पेट्रोलींग दरम्याण गुन्हेगार चेक करीत असतांना गोपनिय माहीती मिळाली की, आईनगरी ले-आउट, सिंदी (मेघे), वर्धा येथे तिन इसम मोटरसायकल व मोपेड गाडीवर संशयीतरित्या फिरत आहे व त्यांच्या हालचाली संशयास्पद आहे. अश्या माहीतीवरून शहानिशा व पुढील कारवाई करीता दोन प्रतिष्ठीत पंच व पोस्टाफसह आईनगरी ले-आउट, सिंदी (मेघे), वर्धा येथे माहीतीप्रमाणे गेलो असता तिन इसम हे आपल्या वाहनावर बसून असतांना दिसले, पो. स्टाफसह घेराव टाकुन त्यांचे जवळ लपत छपत जावुन त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता दोन इसम जागीच मिळून आले व स्पेल्डर गाडीवर बसून असलेला इसम हा मौक्यावरून पळण्याचा प्रयत्न करीत असतांना त्याचा पाठलाग करून त्यास मोठ्या शिताफितीने त्याब्यात घेतले तिन्ही इसमांना विचारपुस केली असता त्यांनी त्यांचे नावे – १) शेख मोबीन शेख इस्वाईल, वय २६ वर्ष, रा. बेंडकीपुरा, चमेडीयानगर, यवतमाळ, ह. मु. शाहीननगर, हैद्राबाद, २) आकाश उर्फ रॅपर राजु वाइवे, वय २१ वर्ष, रा. शांतीनगर, वडगाव, यवतमाळ, ३) रोहीत उर्फ लकी अनिल औरासे, वय २१ वर्ष, रा. चमडीयानगर, ता.जि. यवतमाळ ह.मु. गिट्टीफैल, सांवगी मेघे, वर्धा असे सांगितले त्याची झडती घेतली असता त्यांचे ताब्यातुन १) नगदी भारतीय चलनाच्या एकूण ४२,४००/- रूपये, २) सोण्याचे दोन कानातील टॉप्स ३) सोण्याने ०२ पंन्डट व ०४ बारीक मनी ४) घरफोडी करीता वापरत असलेला एक प्लॉस्टीक मुठ असलेला पेचकस ५) तिन अॅड्राईड मोबाईल ६) एक हिरो होन्डा कंपनीची स्पेल्डर प्लस मोटरसायकल ७) एक बैंग ८) एक सुझुकी कंपनीची मोपेड गाडी ९) एक सुजुकी कंपनीची ऐसेस मोपेड असा एकुण जु.कि. ३,५५,५००/- रू.चा माल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील आरोपीतांना सखोल विचारपुस केली असता त्यांनी पोलीस स्टेशन रामनगर, वर्धा शहर व हिंगणघाट परीसरात बंद घराचे लॉक तोडून एकुण ०४ घरफोडीचे गुन्हे केल्याचे सांगून सदरचा मुद्देमाल हा त्याच गुन्हयातील असल्याची कबुली दिल्याने त्यांना पोलीस स्टेशन रामनगर अपराध क्रमांक ८५९/२०२४ कलम ३०५(१), ३३१ (४), ३(५) भा.न्या.सं., मध्ये गुन्हयाचे पुढील तपासकामी अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाई मा. श्री. अनुराग जैन, पोलीस अधीक वर्धा, मा. डॉ. श्री. सागर कवडे, अपर पोलीस अधिक्षक, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, पोउपनि श्री. बालाजी लालपालवाले, श्री. राहुल इंटेकार, पोलीस अंमलदार गजानन लामसे, चंद्रकांत बुरंगे, भुषण निघोट, रितेश शर्मा, मनीष कांबळे, गोपाल बावणकर, अमोल नगराळे, मंगेश आदे, दिपक साठे, प्रफुल पुनवटकर, अक्षय राउत, सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये