Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनगुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

शेतातील मोटार पंम्प चोरी करणारा अट्टल चोरटा पुलगाव पोलीसांच्या जाळ्यात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन पुलगाव परीसरातील मौजा आकोली ,केळापुर ,विजयगोपाल, कवठा(झोपडी) शेत शिवारातील विहीरीतील तसेच नाल्या वरील पाण्याच्या मोटर पंप चोरी गेल्याने पुलगाव पोलीसांनी शोध मोहीम राबवीली असता दि. 05/12/2024 रोजी रात्री 11/00 वा. दरम्याण माहीतगारा कडुन माहीति मिळाली की मौजा हिवरा (कावरे) शेत शिवारात एक संशईत रित्या स्कँरपीओ गाडीने फीरत आहे अशा माहीति वरुन सदर स्कँरपीओ गाडीला अटकाव करुन गाडी चालकास ताब्यात घेवुन त्या स्काँरपीओ गाडीमध्ये दोन मोटर पंप मिळुन आल्याने त्यास ईतर चोरी गेलेल्या मोटर पंप बाबत विचारणा केली असता त्याने एकुण 12 पोटर पंप चोरी केल्याचे सांगितले त्याचे पासुन एकुण 12 सबमर्सीबल मोटर पंप व 14 नोजप स्पींकलर व एक फोर व्हीलर स्काँरपीओ असा एकुण जुमला कींमत 764000/- रुपयेचा माल हस्तगत करण्यात आला आरोपी याने त्याचे नाव राजपाल शंकर नगराळे रा. बोरगाव(मादणी) ता.जि. यवतमाळ असे सांगीतले.

         पोलीस स्टेशन पुलगाव येथे मोटर पंप चोरी गेल्याचे एकुण 6 गुन्हे नोंद आहे अप. क्रमांक 1) 947/24 कलम 303(2) बी.एन.एस. 2) 995/24 कलम 303(2) बी.एन.एस. 3) 1002/24 कलम 303(2) बी.एन.एस. 4) 891/24 कलम 303(2) बी.एन.एस. 5) 802/24 कलम 303(2) बी.एन.एस. 6) 902/24 कलम 303(2) बी.एन.एस. या गुन्हयामधील संपुर्ण चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला.

           मुद्देमाल मिळुन आलेल्या शेतकऱ्यांची नावे 1. ज्ञानेश्वर नामदेव शिरभाते रा. अकोली 2. गजानन शिरभाते रा. अकोली 3. गोविंदा सोनवणे रा. अकोली 4. वेंकटेश दंडमुंडी रा. चोंडी 5. दिगंबर राजेंद्र झोपाटे रा. विजय गोपाल 6. स्वप्निल दिलीप झोरे रा.विजयगोपाल 7. आकाश रामकृष्ण वानखेडे रा. विजय गोपाल 8. परीक्षित श्रीचंद राठोड रा. साईनगर देवळी 9. हरिभाऊ विठोबाची डगवार रा. विजय गोपाल 10. शरद नामदेव काळे रा.जिजामाता कॉलनी पुलगाव 11. भूषण विनायक आकडे रा. कवठा झोपडी

            सदरची कारवाई मा, पोलीस अधीक्षक अनुराग जैन,मा.अपर पोलीस अधिक्षक ड़ॉ,सागर कवडे, मा.सहाय्यक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुलगाव श्री राहुल चव्हाण, पोलीस स्टेशन पुलगाव ठाणेदार श्री. राहुल सोनवणे यांचे मार्गदर्शनात डिबी पथकाचे चंद्रशेखर चुटे, अमोल जिंदे, रवींद्र जुगनाके, रितेश गुजर, ओमप्रकाश तल्लारी, विश्वजीत वानखेडे, सायबर सेलचे अक्षय राऊत, सैनिक होमगार्ड श्याम जनबंधू यांनी केले

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये