ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सभागृहाचे भूमीपूजन संपन्‍न ; पालकमंत्री ना. मुनगंटीवार यांच्‍या माध्‍यमातून अनुदान उपलब्‍ध

विठ्ठल मंदिर प्रभाग क्र. १५ येथील मजदुर चौक येथील नागरिकांची मागणी पुर्णत्‍वास

चांदा ब्लास्ट

विठ्ठल मंदिर प्रभाग क्र. १५ येथील मजदुर चौक येथील नागरिकांची मागणी होते की,  आपल्‍या परिसरात सभागृह व्‍हावे याकरिता नगरसेविका संगीता खांडेकर यांच्‍याकडे वारंवार मागणी करत होते, त्‍यामुळे चंद्रपूर जिल्‍ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या माध्‍यमातून अनुदान उपलब्‍ध करून दिला. या सभागृहाचे भूमीपूजन दि. १६ जुलै २०२३ ला, सकाळी ११.०० वा. मजदुर चौक, विठ्ठल मंदिर वार्ड, चंद्रपूर येथे
संपन्‍न झाले.

भूमीपूजन सोहळ्याला अध्‍यक्ष म्‍हणून माजी उपमहापौर राहुल पावडे  प्रमुख अतिथी म्‍हणून राजेंद्र खांडेकर, विनोद शेरकी, सचिन कोतपल्‍लीवार,
सुर्यंकांत कुचनवार, माजी नगरसेवक विशाल निंबाळकर, माजी नगरसेविका  संगीता खांडेकर,  राजु जोशी, देवराव रागीड, जगन काटकर, बाबुराव क्षिरसागर यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती. सर्वप्रथम माजी उपमहापौर राहूल पावडे यांच्‍या हस्‍ते भूमीपूजन करण्‍यात आले. तसेच प्रभागातील ज्‍येष्‍ठ नागरिकांचा शाल श्रीफळ देऊन सत्‍कार करण्‍यात आला. या कार्यक्रमाला प्रभागातील सर्व पुरुष महिलांनी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्‍वी करण्‍याकरिता मारोती क्षिरसागर, राजु काटकर, विजय
काळे, कपील जवादे, लाला रागीट, श्रीकांत गर्गेलवार, वैभव येरोजवार, अशोक पडगेलवार, प्रकाश पडगेलवार, राकेश काटकर यांनी अथक परिश्रम घेतले

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये